जालना: एकीकडे कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा एकदा वाढत असल्याने केंद्र व राज्य सरकार आवश्यक ते सर्व उपाययोजना करत आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देखील जनतेला वेळोवेळी मास्क वापरायला सांगत असतात. मात्र इथे त्यांचेच कार्यकर्ते मास्क वापरत नसल्याचे दिसत आहे. कोरोनाचे नियम पायदळी तुडवणं सुरू असल्याचं चित्र बघायला मिळालं. केंद्रीय रेल्वे मंत्री रावसाहेब दानवे यांच्या हस्ते जालन्यात पहिल्या किसान रेल्वेचे उद्घाटन झाले. या कार्यक्रमात मात्र भाजप कार्यकर्त्यांना कोरोनाचा विसर पडला असल्याचे दिसत आहे.
केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या हस्ते आज जालन्यातून पहिली किसान रेल्वे सुरू करण्यात आली. दरम्यान याच किसान रेल्वेचं भाजप नेत्यांकडून औरंगाबादमध्ये स्वागत करण्यात आलं. पण या कार्यक्रमात भाजप नेते आणि कार्यकर्त्यांना कोरोनाचा विसर पडल्याचे पाहायला मिळाले. इथे उपस्थित कुठल्याच नेत्याने मास्क घातला नव्हता तसेच सोशल डिस्टन्स सुद्धा कुठेही पाहायला मिळाले नाही.
जालना जिल्ह्यातील पहिल्या किसान रेल्वेला केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी हिरवा झेंडा दाखवून सुरुवात केली आहे. मात्र कार्यक्रमात दानवे यांनी सुद्धा मास्क घातला नसल्याचे पाहायला मिळाले. दानवे यांच्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवर त्यांचे विना मास्कचे फोटो पाहायला मिळत आहे. त्यामुळे आता मंत्रीच कोरोना नियमांचे उल्लंघन करत असतील तर सर्वसामान्य नागरिकांनी काय करायचं, असा प्रश्न उपस्थित होतो.
महत्वाच्या बातम्या:
- ओमायक्रॉनबाबत दिलासादायक बातमी; जाणून घ्या काय म्हणाले AIIMS चे संचालक
- मराठवाड्यातील जनतेला नववर्षाच्या सुरुवातीला रावसाहेब दानवेंनी दिले ‘हे’ गिफ्ट..!
- ‘सत्तेची खुर्ची डळमळली तेव्हा मुंबई”करां”ची आठवण झाली’; आशिष शेलारांची टीका
- औरंगाबाद मनपा निवडणूक पुन्हा लांबणीवर; न्यायालयाच्या निर्णयाकडे राजकीय पक्षांचे लक्ष..!
- ९५ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी भारत सासणे यांची बिनविरोध निवड..!
>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<
>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<