कोरोना नियमांचं उल्लंघन करत महेबूब शेख यांचे दररोज जंगी कार्यक्रम सुरुच

गडचिरोली : राज्यात गणेशोत्सव आणि संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने अत्यंत कडक निर्बंध लादले आहेत. राज्यात साधेपणाने गणेशोत्सव साजरा करण्याचं आवाहन खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे. तसेच, संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर सर्वपक्षीयांनी सभा, मेळावे टाळावे असं आवाहन देखील मुख्यमंत्री ठाकरे यांनी केलं होतं. यानंतर गर्दी होईल असा एकही राजकीय कार्यक्रम पक्ष घेणार नाही, अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसने घेतली होती. मात्र राष्ट्रवादी युवक आघाडीचे अध्यक्ष महेबूब शेख यांच्या जंगी कार्यक्रमांना काही कोणी आवर घालत नसल्याचं वारंवार स्पष्ट दिसत आहे.

काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांच्या उपस्थितीत पार पडलेल्या एका कार्यक्रमात आणि मेळाव्यात मोठी गर्दी उसळली. यावेळी कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन झाल्याचं दिसून आलं. विशेष म्हणजे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील स्वतः मंचावर होते. यावर आज शरद पवार यांनी स्पष्टीकरण देवून त्यांनी इथून पुढे पवार यांनी गर्दी होणाऱ्या कार्यक्रमाला जाणार नसल्याचं जाहीर केले आहे. मात्र महेबूब शेख यांच्या जंगी कार्यक्रमांना आवर कोण घालणार?, असा सवाल आता उपस्थित होत आहे.

महेबूब शेख यांना सर्वसामान्य नागरिकांप्रमाणे कोणतेच निर्बंध नाहीत का?,  सामान्य नागरिकांवर होते तशी कारवाई शेख यांच्यावर का होत नाही? त्यांच्यासाठी कायदा वेगळा आहे का?, प्रशासनाला शेख यांचे कार्यक्रम दिसत नाहीत का?, असे सवाल आता उपस्थित होत आहेत.

महेबूब शेख हे राज्यात ठिकठिकाणी दररोज जंगी कार्यक्रम घेत आहेत. त्यांच्या सभा, मेळावे काही थांबायचं नाव घेत नसल्याचं पाहायला मिळत आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये महेबूब शेख कोरोनाच्या कोणत्याही नियमांचं पालन करत नसल्याचं स्पष्ट दिसत असताना पक्ष किंवा प्रशासनाकडून त्यांच्यावर कोणतीच कारवाई केली जात नाही. दर्यापूर, वर्धा, अमरावती, अकोला यासह अनेक ठिकाणी शेख यांच्या जंगी कार्यक्रम झाले असून आज शेख यांचा गडचिरोलीमध्ये जंगी कार्यक्रम सुरु आहेत.

महत्वाच्या बातम्या :