‘खता तो जिंदगीभर मैं करता आया, धुल चेहरे पे थी, आयना पुच्छता रहा’ विनोद तावडे भावूक

vinod tawade sad

मुंबई: शिक्षण विभागाच्या प्रत्येक निर्णयावर टीका केली जाते. त्यामुळे विधान परिषदेत शिक्षणमंत्री विनोद तावडे भावूक झाले. ”शिक्षण विभागाच्या निर्णयावर विरोधकांकडून नेहमी टीका केली जाते. मात्र एवढे उपक्रम राबवले, त्याचं कुणी एक शब्दानेही कौतुक केलं नाही,” असे बोलतांना तावडे आज सभागृहात भावूक झाले.

Loading...

विनोद तावडे यांनी विरोधकांवर चांगलाच निशाणा साधला. थ्री इडियट चित्रपटच उदाहरण देतांना तावडे म्हणाले, ”थ्री इडियट पाहायला छान वाटतो. फुंसूक वांगडू इथे आले, त्यांनी चर्चा केली. लेह-लडाखच्या वांगडूंना आम्ही जे प्रयोग केले ते दिसले, पण तुम्हाला दिसत नाही,”

आम्ही नापास विद्यार्थ्यांना त्याच वर्षी परीक्षा देण्याची व्यवस्था केली. तसेच अनेक विद्यार्थ्यांचं आयुष्य वाचविले. कारण, ही मुलं शरमेने व्यसनाच्या आहारी जायचे. ७० हजार मुलं पहिल्या वर्षी पास झाले. या मुलांचं वर्ष वाचवलं हे तुम्हाला दिसलं नाही का? असा प्रश्न तावडे यांनी उपस्थित केला. तसेच गुढी पाडव्याला शिक्षकांचे पगार देता आले नाही. सहकारी बँका जगाव्या अशी अपेक्षा होती. कोर्टाचे निकाल आले, पगार महत्त्वाचा कि बँक ? गुढी पाडव्याला शिक्षकांचे पगार झाले नाही, त्याबद्दल माफी मागतो, त्याचं मला वाईट वाटलं.Loading…


Loading…

Loading...