विनोद तावडे यांचा आणखी एक ‘विनोद’

कर्मवीर भाऊराव पाटील यांचा उल्लेख चक्क कर्मवीर भाऊराव देशमुख असा केला

मुंबई : शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव नंदकुमार यांची पाठराखण करताना शिक्षणमंत्र्यांनी दिलेल्या स्पष्टीकरण पत्रात कर्मवीर भाऊराव पाटील यांचा उल्लेख चक्क कर्मवीर भाऊराव देशमुख असा केला आहे. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या आडनावात चूक झाल्याने तावडे याचं अज्ञान पुन्हा एकदा समोर आलं आहे

शिक्षण विभागाचे एेंशी हजार शाळा बंद करण्याचे कोणतेही धोरण नाही. याबाबतचे अधिक स्पष्टीकरण देताना तावडे यांनी अनेक महापुरुषांच्या शिक्षणक्षेत्रातील योगदानाचा उल्लेख केला. छत्रपती शाहू महाराज, फुले, आंबेडकर आणि कर्मवीर भाऊराव देशमुख यांनी बहुजनांसाठी शिक्षणाची दारे उघडली, या वाक्याने आता पुन्हा नवा वाद निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तावडेंकडे शिक्षणमंत्री तसेच सांस्कृतिक मंत्रालय आणि मराठी भाषा विभागाचाही कार्यभार आहे. तरीही तावडे यांच्या पत्रात गेल्या काही घटनांमाध्ये सातत्याने चुका दिसून आल्या होत्या.

You might also like
Comments
Loading...