शरद पवार यांना शहरी नक्षलवाद्यांना वाचवायचं आहे, त्यासाठी त्यांचा आटापिटा

टीम महाराष्ट्र देशा : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दोन पानांचे पत्र लिहिले आहे. ज्यामध्ये कोरेगाव भीमा प्रकरणाची एसआयटी चौकशी करावी, अशी मागणी केली आहे. या पत्रात पवारांनी तत्कालीन फडणवीस सरकारवर गंभीर आरोप केले आहेत.

“भीमा कोरेगाव प्रकरणाच्या चौकशीसाठी एसआयटीची गरज आहे. कारण देवेंद्र फडणवीस सरकारने सत्तेचा चुकीचा वापर केला. फडणवीस सरकारने माध्यमांनाही चुकीची माहिती दिली. तसेच पोलिसांच्या मदतीने हे घडविलेले षडयंत्र होते. मुख्य सूत्रधारांना पाठीशी घालून जनतेची दिशाभूल करण्याचा डाव होता, असा आरोप पवारांनी केला आहे. यावर आता भाजपचे नीट विनोद तावडे यांनी आपली प्रतिक्रिया देत पवारांवर जोरदार टिका केलि आहे.

Loading...

“शरद पवार यांना शहरी नक्षलवाद्यांना वाचवायचं आहे. त्यासाठी हा आटापिटा चालला आहे. एखाद्या गुन्हेगाराला वाचवण्याच्या नादात आपण जीव धोक्यात टाकून काम करणाऱ्या पोलिसांवर अविश्वास दाखवतो. त्यांचं मनोबल आपण तोडतो. राज्याचे मुख्यमंत्री राहिलेले शरद पवार गृहमंत्री देखील राहिले आहेत. त्यांनी अशाप्रकारचं राजकारण करुन पोलिसांचं मनोबल तोडणं हे अतिशय दुर्दैवी आहे. किमान शरद पवारांकडून ही अपेक्षा नाही.” असा घनाघात विनोद तावडे यांनी केला आहे.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

...त्यामुळे मी मोठ्या मनाने माफी मागते - तृप्ती देसाई
'पाच वर्षे सत्तेत राहून पराभव झाला मात्र, मी पराभूत झाल्याचा सर्वात जास्त आनंद माझ्या मुलाला झाला'
मनसेच्या रणरागिणीचं तृप्ती देसाईंना खुले आव्हान, तू येच...
कर्जमाफीसाठी पात्र असलेल्या शेतकऱ्यांची यादी आता 'या' दिवशी जाहीर होणार
यापुढे मी इंदुरीकरांना महाराज म्हणणार नाही - तृप्ती देसाई
तर पवारांची औलद सांगणार नाही, अजित पवारांची भीष्मप्रतिज्ञा
महाविकास आघाडीचे 'जनक देवेंद्र फडणवीस' आहेत : शिवाजीराव आढळराव पाटील
गोपीनाथ मुंडेंच्या आग्रहाला 'बळी' पडलो; मोदींवर विश्वास ठेवला, मात्र घडलं 'भलतंच'
इंदुरीकर महाराज समर्थकांकडून तृप्ती देसाईंचे होणारे चारित्र्यहनन महिला प्रतिनिधींना दिसत नाही का?
दणका राज ठाकरेंचा ! औरंगाबादमध्ये 'मनसे गद्दाराची' केली 'हकालपट्टी'