बहुजनांच्या मतांवर डाेळा ठेवून पगड्या बदलणाऱ्यांना मला उत्तर द्यायचे नाही : विनाेद तावडे

vinod tawade

पुणे : बहुजनांच्या मतांवर डोळा ठेवून पगड्या बदलणाऱ्यांना मी उत्तर देऊ इच्छित नाही असे म्हणत शिक्षणमंत्री विनाेद तावडे यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली आहे.सिंबायोसिसच्या कला आणि राज्य सरकारने शाळा बंदचा घेतलेला निर्णय हा फुले, शाहू, आंबेडकरांच्या विचारांशी सुसंगत नाही अशी टीका शरद पवार यांनी काही दिवसांपूर्वी केली होती, त्याला उत्तर देताना तावडे यांनी हा टोला लगावला आहे. वाणिज्य महाविद्यालयाच्या तिसऱ्या पदवीप्रदान सोहळ्यात तावडे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्तिथ होते, त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

नेमकं काय म्हणाले विनोद तावडे?
शरद पवार यांच्यासारखी अभ्यासू व्यक्ती निवडणूका जवळ अाल्या की राजकीय बाेलतात याचा जुना अनुभव अाहे, ताेच अाता येत आहे.फुले, शाहू, अांबेडकरांच्या महाराष्ट्रात बहुजन समाजातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यावर अामचा भर अाहे त्यामुळे बहुजनांच्या मतांवर डोळा ठेवून पगड्या बदलणाऱ्यांना मी उत्तर देऊ इच्छित नाही.