मुंबई: मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्याच्या मागणीसाठी काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई (Subhash Desai) यांच्या उपस्थितीत राष्ट्रपती रामनाथ कोविंद (Ramnath Kovind) यांना चार हजार पोस्टकार्ड पाठवण्यात आले. मराठी भाषेच्या मुद्द्यावरून आता भाजप नेते विनोद तावडे यांनी शिवसेनेवर टीका केली आहे.
विनोद तावडे म्हणाले, फक्त २७ फेब्रुवारी जवळ आल्यावरच मराठी भाषा दिन आठवतो का? असा सवाल विनोद तावडे यांनी केला आहे. प्रामाणिक प्रयत्न करायचे झाल्यास त्यावर नियमित काम करत राहावं लागतं, असा खोचक टोलाही तावडेंनी शिवसेनेला लगावला आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळणं हे मराठी भाषेचं क्रेडीट असेल, असंही तावडे म्हणाले.
यावेळी बोलताना विनोद तावडे यांनी संजय राऊत यांच्या भाषेवरून नाराजी व्यक्त केली आहे. ज्या पद्धतीनं शिव्यांचं राजकारण सुरु आहे ते महाराष्ट्राला अभिप्रेत नाही. राजकारणातील बदललेल्या भाषेमुळं महाराष्ट्राचं नाव बदनाम होत आहे. हे सगळं टाळून मुद्द्याचं राजकारण केलं जाऊ शकतं. संजय राऊत हे संपादक आहेत, माझे मित्र आहेत. पण ज्या पद्धतीनं ते बोलत आहेत, त्यामुळे महाराष्ट्राच्या प्रतिमेवर शिंतोडे उडाले आहेत एवढं नक्की, असं तावडे म्हणाले.
महत्वाच्या बातम्या:
-
‘‘लडकी हूं, लड सकती हूं’ हा नारा आता परिवर्तन घडवल्याशिवाय राहणार नाही’; यशोमती ठाकूर यांचा विश्वास
-
‘देशात मोदी आणि योगी सरकार हे सर्वात’…; सोनिया गांधी यांचा हल्लाबोल
-
‘जिल्हा बँकांनी साखर करखान्या व्यतिरिक्त उत्पन्नाचे साधन शोधावे’; शरद पवारांचा सल्ला
-
‘जय भवानी ही घोषणा सर्वप्रथम डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिली’ – अॅड. प्रकाश आंबेडकर
>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<
>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<