#पक्षांतर : ‘कॉंग्रेस-राष्ट्रवादीमधील नेते भाजपात येत असतील, तर त्याला आम्ही काय करणार’

vinod tawade

टीम महाराष्ट्र देशा :  विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात सध्या पक्षांतराचे वारे वाहत आहे. आघाडीतील बरेच नेते शिवसेना किंवा भाजपमध्ये प्रवेश करत आहेत. याविषयी विनोद तावडे यांनी भाष्य केले आहे.

विनोद तावडे यांनी पुणे विद्यापीठात विविध अभ्यासक्रम, सोयीसुविधांचा आढावा घेतला. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी बोलताना पक्षांतरावर भाष्य केले ‘भाजप कुणावरही पक्षप्रवेशासाठी सक्ती करत नसून नुसत्या नजरेने जर राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेसमधील नेते भाजपात येत असतील, तर त्याला आम्ही काय करणार. असा टोला उच्च शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी लगावला.

ashok chvhan vr vinod tawade

कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीकडून पक्षांतरावरून सेना-भाजपला टार्गेट केले जात आहे. राष्ट्रवादीचे प्रेदेशाध्यक्ष पाटील यांनी भाजप आणि शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांच्या मागे लागलले आहेत. आमचे नेते खेचण्यासाठी सर्व मार्गाने प्रयत्न केले जात आहेत. सरकारी यंत्रणांची मदत घेतली जात आहे असा आरोप केला आहे.

दरम्यान, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीतून आतापर्यंत बऱ्याच नेत्यांनी पक्षांतर केले आहे. त्यात महिला नेत्या चित्रा वाघ मुंबईचे नेते सचिन अहिर यांचा समावेश आहे. तर इतरही अनेक नेते भाजपच्या वाटेवर असल्याच बोललं जात आहे.

आपल्या मागण्य़ांसाठी संप करणं हा त्यांचा हक्क : विनोद तावडे

नगरमधील राष्ट्रवादीचं अस्तित्व धोक्यात, संग्राम जगतापही पक्षांतराच्या तयारीत ?