माजी मंत्री ‘विनोद तावडे’ विधिमंडळ आवारात आले आणि…

टीम महाराष्ट्र देशा : भाजप नेते आणि  माजी शिक्षण आणि सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे आज विधीमंडळाच्या आवारात आले. आमदारकी आणि सत्ता गेल्यानंतर तावडे आज विधीमंडळात आले माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यासोबत. परंतु विधिमंडळाचे सदस्य नसल्याने माध्यमांतील प्रतिनिधींशी गप्पा मारून ते परतही गेले.

एकेकाळी तावडेंचा पक्षात मोठा दबदबा होता. २०१४ च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या काळात पक्षात तावडे यांची महत्वाची भूमिका होती. विधानसभा २०१४च्या निवडणुकीत राज्यातील अनेक मतदारसंघातील उमेदवारांची तिकीटे तावडे यांनी वाटली होती.

Loading...

विरोधात अस्ताने तावडे आक्रमक होते त्यामुळे त्यानंतर आलेल्या सत्तेच्या काळात सुरवातीला तावडे यांची पक्षात मोठी ताकद होती. मात्र नंतर पक्षातील वरिष्ठांची त्यांच्यावर मर्जी राहिली नाही.

दिल्लीतील शीर्ष पक्ष नेतृत्त्वावाकडे त्यांच्याबद्दल काय माहिती गेली, ती कुणी पुरविली याबद्दल पक्ष आणि राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा झाली. मात्र त्यात तावडे यांचेच राजकीय नुकसान झाले.

सुरवातीला सत्तेत अस्ताने त्यांच्याकडील एक एक मंत्रीपदातील खाते कमी केले गेले. तसेच त्यांचे पक्षातील महत्वही नियोजनपूर्वक कमी केले गेले अशी चर्चा आहे.

इतकच काय तर गेल्या निवडणुकीत त्यांची उमेदवारी कापण्यात आली. ज्यांनी पाच वर्षापूर्वी इतरांना तिकिटे दिली त्यांना  स्वत:ला पाच वर्षांनी तिकिट मिळणे दुरापास्त होऊन बसले.

आता पक्षही सत्तेत नाही आणि तावडे विधिमंडळाचे सदस्यही नाही. येत्या काळात विधान परिषदेवरील नियुक्तीत तावडेंच्या नावावर विचार होण्याची शक्यता आहे.

हेही पहा –

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

‘या’ तारखेपासून रेल्वे तिकीट बुकिंगला होणार सुरुवात?
कोरोनाला घालवण्यासाठी देशाला 21 नाही तर 49 दिवसांच्या लॉकडाऊनची गरज !
चीनने पाकिस्तानची केली क्रूर चेष्टा; N-95 मास्क ऐवजी चक्क अंडरवेअर पासून बनविलेले मास्क पाठवले
कनिका कपूरच्या तब्ब्येतीबाबत डॉक्टरांनी केला वेगळाच दावा
तळीरामांना दारूवाचून राहावेना; पठ्ठ्यांनी 'यूट्यूब'वर पाहून घरीच तयार केली दारू
आज सांयकाळी आणि उद्या सकाळी दुध मिळणार नाही कारण.....
कोरोनामुळे उद्धव ठाकरे सरकारचे भवितव्य टांगणीला ; वाचा 'काय' आहे प्रकरण
निलंग्यातील मज्जीदमधून १२ परप्रांतीय पोलिसांच्या ताब्यात !
अमेरिकेत 'कोरोना'चं थैमान; डोनाल्ड ट्रम्प यांनी मोदींकडे मागितला 'मदतीचा हात'
प्रसिद्धीची पंतप्रधान नरेंद्रजी मोदींना गरज नाही, देशमुखांनी आव्हाडांना झापलं