‘राजेंची पावर सगळ्या देशाने पाहिलीय, आता दोन्ही राजांनी सरकारला वाकवून दबाव आणावा’

vinod patil - sambhajiraje-udayanraje

मुंबई : खासदार संभाजीराजे छत्रपती आणि खासदार उदयनराजे भोसले हे एकत्र आले असल्याने आमच्यासाठी अभिमानाची बाब असून आता दोन्ही राजांनी मिळून राज्य सरकार आणि केंद्र सरकारवर दबाव आणावा. त्यांनी मराठा आरक्षण आणि मराठा आरक्षणाला पर्यायी व्यवस्था करून द्यावी यासाठी दबाव आणावा अशी अपेक्षा मराठा आरक्षण याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी व्यक्त केलीये. दोन्ही राजे एकत्र येत दिल्ली सरकार आणि महाराष्ट्र सरकारला वाकवतील अशी आशा व्यक्त करत आरक्षणाच्या प्रश्नी दबाव आणावा अशी विनंती याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी व्यक्त केलीये.

आज पुण्यात संभाजीराजे आणि उदयनराजे यांच्यात मराठा आरक्षण प्रश्नी भेट झाली. या भेटीनंतर संभाजीराजे आणि उदयनराजे यांनी एकत्रच माध्यमांशी संवाद साधला. यावेळी दोन्ही राजेंनी रोखठोक भाष्य केलं. दरम्यान, संभाजीराजे आणि माझं ध्येय एकच आहे, ते म्हणजे मराठा समाजाला आरक्षण. त्यामुळे समाजाच्या प्रश्नासाठी संभाजीराजेंनी उचललेलं पाऊल हे योग्य आहे, असं म्हणत उदयनराजे यांनी संभाजीराजेंचा १६ जून रोजीच्या आंदोलनाला पाठींबा दिला आहे.

मला आजही आठवत की संभाजीराजे यांनी ज्या वेळी राष्ट्रपती नियुक्त राज्यसभेचे सदस्य झाले त्यावेळी मोदीजींनी त्यांचे स्वागत 90 डिग्री सेल्सिअस मध्ये वाकून केले. राजेंची पावर सगळ्या देशाने पहिली, त्यामुळे त्यांनी या दोनही सरकारवर जर दबाव आणला तर निश्चितच आरक्षणाची वाट सुकर होईल. पुन्हा एकदा सांगतो आज झालेल्या दोन राजेंच्या भेटीने निश्चितच आरक्षणाच्या लढ्याला बळ मिळेल. असं देखील विनोद पाटील म्हणाले आहेत.

दरम्यान, राज्यात मराठा आरक्षणाचा प्रश्न पेटला आहे. खासदार संभाजी छत्रपती यांनी ६ जून रोजी रायगडावरून मराठा आरक्षणासाठीच्या आंदोलनाची घोषणा केली आहे. येत्या १६ जून रोजी मराठा आरक्षणासाठी पहिला मोर्चा काढण्यात येणार आहे. मराठा आरक्षणाच्या संदर्भात खासदार उदयनराजे भोसले आणि खासदार संभाजी छत्रपती यांची बहुप्रतिक्षीत भेट काही दिवसांपूर्वी उदयनराजे यांच्या आधीच ठरलेल्या काही कार्यक्रमांमुळे होऊ शकली नव्हती. त्यामुळे राज्यभरात उलट-सुलट चर्चांना उधान आले होते. मात्र, आज ( १४ जून ) पुण्यात हे दोन्ही राजे भेटले आहेत. या भेटीकडे सबंध महाराष्ट्राचं लक्ष लागलं होतं.

महत्वाच्या बातम्या 

IMP