नरेंद्र मोदींच्या नावाने ‘शहीद’ होणाऱ्यांनो निखील वागळेंचा ‘सडेतोड’ माझ्यामुळे बंद झाला…

‘इंडिया टीव्हीचे’ माजी व्यवस्थापकीय संपादक आणि टीआरपी किंग विनोद कापरी यांचा दावा

वेबटीम: टीव्ही ९ मराठी वाहिनीवर सुरु असणारा निखील वागळे यांचा ‘सडेतोड’ हा डिबेट शो अचानक बंद करण्यात आला. हा कार्यक्रम बंद होण्याला भाजप नेत्यांकडून चॅनल वर आलेला दबाव कारणीभूत असल्याचा निखील वागळे सांगत आहेत. मात्र भाजप नेत्यांमुळे नाही तर सडेतोड या शोचा टीआरपी अत्यंत खालावलेला असल्याने तसेच मी दिलेल्या सल्यामुळेच हा शो बंद करण्यात आल्याच ‘इंडिया टीव्हीचे’ माजी व्यवस्थापकीय संपादक आणि टीआरपी किंग विनोद कापरी यांनी आज फेसबुक पोस्टद्वारे सांगितल आहे.

नरेंद्र मोदींच्या नावाने ‘शहीद’ होणाऱ्यांनो

या पोस्टमध्ये विनोद कापरी यांनी निखील वागळेना नरेंद्र मोदींच्या नावाने ‘शहीद’ होण बंद करा असा  खोचल सल्ला  दिला आहे. कापारी यांच्या पोस्टनुसार सडेतोड या शोचा टीआरपी अत्यंत खालावलेला होता. तसेच टीव्ही ९ च्या व्यवस्थापनाने जून महिन्यात आपल्या चॅनलची टीआरपी वाढवण्यासाठी या शोची वेळ संध्याकाळी ९ ते १० ऐवजी सायंकाळी ५ ते ६ असा करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र निखील वागळे यांना हि गोष्ठ सांगण्यात आल्यानंतर त्यांनी एक महिन्याची मुदत मागून घेत आपण ‘सडेतोड’चा टीआरपी वाढवून दाखवू अस सांगितल होत. मात्र एक महिन्यात ते झाल नाही .

पुढे १९ जुलै रोजी टीव्ही ९ चे व्यवस्थापकीय संपादक  उमेश कुमावत यांनी वागळे यांना सडेतोड कार्यक्रमची वेळ बदलावी लागणार असल्याच सांगितल मात्र वागळे यांनी आपल्या स्वभावानुसार ‘ शो केला तर रात्री ९ वाजताच करणार अन्यथा नाहीच करणार ‘ हे सांगितल. आणि दुसऱ्या दिवशी ट्विटर वर पोस्ट करत ‘ आपल्यावर अन्याय केला जात असल्याच सांगितल’ वागळेंची हि पोस्ट पडतच त्यांच्या सगळ्या ‘लिबरल आणि सेक्युलर’ बटालियनने भाजप आणि मोदींच्या नावाने खडे फोडायला सुरुवात केल्याच विनोद कापरी यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये सांगितल आहे.

विनोद कापरी यांची फेसबुक पोस्ट

दरम्यान विनोद कापरी यांच्या या पोस्टनंतर निखील वागळे आणि कापरी यांच्यात ट्विटर युद्ध सुरु झाल आहे.

निखील वागळे यांनी ट्विट करत भाजप आणि आरएसएसवर पुन्हा एकदा निशाना साधला आहे ‘ आता हे लोक खोट बोला पण रेटून बोलाचा प्रकार करत असल्याच म्हंटल आहे

नेमकं काय आहे प्रकरण वाचा हि लिंक-

निखील वागळेंचा ‘सडेतोड’ अचानक बंद का ?