fbpx

भारताची अजून एक सुवर्णकन्या; कुस्तीत जिंकले सलग तिसरे सुवर्णपदक

टीम महाराष्ट्र देशा : धावपटू हिमा दास नंतर आता अजून एक सुवर्णकन्या भारताचे नाव जागतिक स्तरावर उंचावत आहे. कुस्तीपटू विनेश फोगटनं पोलंड ओपन कुस्ती स्पर्धेत महिलांच्या ५३ किलोग्रॅम वजनी गटात विजय मिळवत सलग तिसरे सुवर्णपदक जिंकले आहे.

पोलंड ओपन कुस्ती स्पर्धेत ५३ किलो वजनी गटात तिचा सामना पोलंडच्या रुक्सानाशी झाला. या सामन्यात विनेश फोगटनं रुक्सानाला  ३-२ ने पराभूत करत सुवर्णपदकाची कमाई केली. तसेच विनेशने उपांत्यपूर्व सामन्यात रिओ ऑलिंपिकमधील कांस्यपदक विजेत्या स्वीडनच्या सोफिया मॅटसनला हरवलं होतं.

विनेशनं मागच्या महिन्यात स्पेनमध्ये झालेल्या ग्रां प्री आणि तुर्कीत झालेल्या आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत सुवर्ण पदके पटकावली होती. आणि आताही पोलंड ओपन कुस्ती स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले आहे. त्यांमुळे तिचे हे सलग तिसरे सुवर्णपदक आहे.

दरम्यान, यापूर्वी हिमा दासने २० दिवसांत पाच सुवर्णपदक जिंकली होती . त्यात २०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत ४ सुवर्णपदके तर ४०० मीटरमध्ये १ सुवर्णपदक जिंकले होते.

मोठी बातमी : ३७० कलम हटणार, तर जम्मू-काश्मीर केंद्रशासित प्रदेश बनणार

३५अ’च काय संपूर्ण ३७० कलम हटवण्याचा मोदी सरकारचा निर्णय

#जम्मू काश्मीर : आजचा दिवस हा भारतीय लोकशाहीतील ‘काळा दिवस’ : मेहबूबा मुफ्ती

शिवसेना प्रवेशाचा निर्णय महिनाभरात घेणार, राष्ट्रवादी कॉंग्रेस आमदार दिलीप सोपल