Share

Vinayak Raut | “ऋतुजा लटकेंनी 3 ऑक्टोबरलाच राजीनामा दिला होता, मात्र…”, विनायक राऊतांचा शिंदे गटावर आरोप

मुंबई : ऋतुजा लटके यांचा राजीनामा मंजूर होत नसल्याने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे म्हणजे उद्धव ठाकरे गटाच्या अडचणी वाढत आहेत. एवढंच नाही तर यावरुन राजकारण देखील पेटताना दिसत आहे. राजीनामा न मिळाल्याने लटकेंनी हायकोर्टात धाव घेतली असून याची सुनावणी सध्या सुरु आहे. अशातच विनायक राऊत यांनी एकनाथ शिंदे गटावर गंभीर आरोप केला आहे.

यादरम्यान, ऋतुजा लटके यांनी नियमानुसार तीन ऑक्टोबरला आपल्या पदाचा राजीनामा दिला असल्याचं विनायक राऊतांनी सांगितलं आहे. तसेच नियमानुसार एक महिन्याचा पगार देखील महापालिकेत जमा केला. मात्र ऋतुजा लटके यांना आम्ही उमेदवारी देऊ नये, यासाठी शिंदे सरकारकडून महापालिका आयुक्तांवर दबाव आणला गेला, असं देखील त्यांनी म्हटलं आहे.

ऋतुजा लटके यांच्या वकीलांनी त्यांचा युक्तीवाद मांडला होता. यावेळी यांना निवडणूक लढवायची आहे, हे त्यांनी सप्टेंबरमध्ये सांगितलं होतं. मी राजीनामा दिला. एक महिनाच्या पगार 67 हजार रूपये दिले. त्यांची रिसिट माझ्याकडे आहे.3 ऑक्टोबरला निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर मी रितसर राजीनामा दिला. आता हे प्रकरण आयुक्तांकडे गेलं आहे. खरंतर हे प्रकरण आयुक्तांकडे जाण्याची गरज नाही. पण या प्रकरणात राजकारण होत आहे. पैसे भरले असतानादेखील मला राजीनामा मंजूर झाल्याचं पत्र दिलं जात नाही, एखाद्या व्यक्तीला राजीनामा देऊन निवडणूक लढवायची असेल तर तुमची अडचण काय आहे, असा साडेतोड सवाल विचारण्यात आला आहे.

दरम्यान, सध्या सुनावणी स्थगित करण्यात आली असून दुपारी अडीज वाजता पुन्हा सुनावणीला सुरूवात होणार आहे. त्यामुळे न्यायालय याबाबत काय निर्णय देणार? याकडेच सर्वांचंच लक्ष लागून आहे.

महत्वाच्या बातम्या :

मुंबई : ऋतुजा लटके यांचा राजीनामा मंजूर होत नसल्याने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे म्हणजे उद्धव ठाकरे गटाच्या अडचणी वाढत आहेत. …

पुढे वाचा

Maharashtra Marathi News Mumbai Politics

Join WhatsApp

Join Now