fbpx

सेल्स टॅक्समध्ये चपराशी असलेल्याने मला हिणवू नये, विनायक राऊतांचा राणेंवर घणाघात

टीम महाराष्ट्र देशा : निवडणुकांच्या रणधुमाळीत प्रतिस्पर्धी उमेदवारावर आरोप आणि टीका होतच असतात पण त्या आरोप आणि टीकांना जेव्हा प्रत्युत्तर येथे तेव्हा त्याची खरी मजा पाहायला मिळते. अशीच मजा नारायण राणे आणि विनायक राऊत यांच्या मध्ये पाहायला मिळाली. सेल्स टॅक्समध्ये चपराशी असलेल्या नारायण राणे यांनी मला नॉन मॅट्रीक म्हणून हिणवू नये. अन्यथा आम्ही पुस्तक उघडले तर आपला पंचनाम होईल असा घणाघात युतीचे उमेदवार विनायक राऊत यांनी केला आहे. विनायक राऊत एका पत्रकार परिषदे मध्ये बोलत होते.

यावेळी राऊत म्हणाले की, महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या कालच्या सभेमध्ये विद्वान नेते नारायण राणे यांनी दोन वेळा मला नॉन मॅट्रिक म्हणाले. त्याला उत्तर देणे आवश्यक होते. माझ्यावर आरोप करणाऱ्या राणे यांनी तीन वर्षांमध्ये सर्वोच्च सभागृहात शून्य वेळा तोंड उघडले. तसेच नीलेश राणे यांनी 19 वेळा आणि मी सव्वाशे ते दीडशेवेळा कोकणातील प्रश्न मांडले. त्यामुळे तुम्ही काय दिवे लावले ते सांगा.असा सवाल राऊत यांनी यावेळी विचारला. तसेच जेव्हा आम्ही एकेकाळी सहकारी होतो. तेव्हा राणे यांना भाषण, लेख कोण लिहून द्यायचे हे मला बोलायला लावू नका.असे देखील राऊत यावेळी म्हणाले.

दरम्यान रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघातून युतीचे उमेदवार म्हणून शिवसेनेकडून विनायक राऊत निवडणूक लढवणार आहेत. तर महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष हा त्यांचा खरा प्रतिस्पर्धी असणार आहे. महाराष्ट्र स्वभिमान पक्षाने या लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात निलेश राणे यांना उतरवल आहे. त्यामुळे भाजपच्या दोन्ही मित्र पक्षांची एक अनोखी लढत या मतदार संघामध्ये पाहायला मिळणार आहे.