fbpx

बीडमध्ये पंकजा मुंडेंना सहकार्य करणार नाही: विनायक मेटे

pankaja munde vr vinayak mete

टीम महाराष्ट्र देशा : राज्यात भारतीय जनता पक्षाची शिवसंग्राम पक्षाशी युती आहे, बीडमध्ये भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे या कार्यकर्त्यांवर अन्याय करतात असा आरोप शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांनी केला. यामुळे यापुढे बीडमध्ये पंकजा मुंडे यांच्यासोबत काम करणार नाही परंतु राज्यात भाजपसोबत काम करणार असल्याचा निर्णय विनायक मेटेंनी घेतला आहे.

पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्याकडून कार्यकर्त्यांवर सतत अन्याय होत असल्याचा आरोप शिवसंग्रामच्या कार्यकर्त्यांनी केला होता. पंकजा मुंडे यांना सहकार्य करणार नसल्याबाबत आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करणार असल्याचही विनायक मेटे म्हणाले. शिवसंग्रामच्या या निर्णयामुळे पंकजा मुंडे यांना जोरदार फटका बसण्याची शक्यता आहे.

पंकजा मुंडे यांनी राष्ट्रवादीचे आमदार जयदत्त क्षीरसागर यांना जवळ केल्याने विनायक मेटे नाराज झाले होते. शिवसंग्रामचे प्रदेशाध्क्ष राजेंद्र म्हस्के यांनाही पंकजा मुंडे यांनी विनायक मेटे यांच्यापासून दूर केलं होते. त्यामुळेही विनायक मेटे यांनी हा निर्णय घेतला असावा अशी शक्यता आहे. मेटेंच्या या निर्णयामुळे पंकजा मुंडे यांना किती फटका बसतो हे पाहणं महत्वाच ठरणार आहे.