महाविकास आघाडीचा ‘हा’ निर्णय म्हणजे पूर्ण मराठा समाजाची मुस्कटदाबी करणारा – विनायक मेटे

vinayak mete

मुंबई : विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनासंदर्भात आज विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीची बैठक झाली. या बैठकीत पुढील महिन्यात म्हणजे ५ आणि ६ जुलै रोजी असं दोन दिवसांचं पावसाळी अधिवेशन घेण्याचा निर्णय घेण्यात आला. दोन दिवसांचंच अधिवेशन घेण्याचा निर्णय घेण्यात आल्यामुळे भाजपाने बैठकीतून बहिष्कार टाकत सभात्याग केला.

महाविकास आघाडी सरकारच्या या निर्णयानंतर भाजपने हल्लाबोल केला आहे. राज्यात चक्रीवादळग्रस्तांना मदतीची प्रतीक्षा, मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण, पदोन्नती आरक्षण, कोरोना काळातील भ्रष्टाचार, आशा वर्कर्स, धनगर आरक्षण, प्रलंबित नियुक्त्या, एमपीएससी परीक्षा, कोरोनामुळे मृत पावलेल्या रुग्णांच्या आकड्यांची लपवाछपवी, परिचारिकांसह कोरोना योद्ध्यांचे मानधन, कायदा सुव्यवस्था, सत्ताधारी पक्षांतील मतभेद आणि त्यामुळे निर्णयांवरून जनतेच्या मनात होणारा संभ्रम असे अनेक महत्वाच्या प्रश्नांवर चर्चा आणि सरकारने उत्तर देणं अपेक्षित असताना कोरोनाचं कारण देत अधिवेशन गुंडाळण्याच्या मुद्द्यावरून विरोधक अधिक आक्रमक झाले आहेत.

दरम्यान, शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटे यांनी देखील महाविकास आघाडी सरकारला लक्ष्य केलं आहे. ‘आज विधिमंडळ सल्लागार समितीची बैठक पार पडली. त्या बैठकीमध्ये मराठा आरक्षणावरून अधिवेशनात तीन दिवस चर्चा व्हावी अशी मागणी बैठकीमध्ये करण्यात आली. त्यावर खूप वेळ चर्चादेखील झाली, परंतु सरकारने या बैठकीचे कामकाज रेटून नेऊन संपूर्ण अधिवेशन २ दिवसा घेण्याचे ठरवले. कोर्टातले आरक्षण टिकवता आले नाही, सभागृहात चर्चा करायची नाही, सरकार हातातले निर्णय घेत नाही, पूर्ण समाजाची मुस्कट बाजी करण्याचा सरकारने निर्णय घेतला आहे. त्याचा निषेध करून व बैठकीवर बहिष्कार टाकून आम्ही बैठकीतून बाहेर पडलो आणि निषेध नोंदवला,’ असं भाष्य विनायक मेटे यांनी केलं आहे.

महत्वाच्या बातम्या 

IMP