मुंबई : काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष व महसूल मंत्री बाळासाहेब थोरात हे प्रदेशाध्यक्षपद सोडण्यावर ठाम आहेत. यामुळे राज्यातील राजकीय हालचालींना वेग आला आहे. प्रदेशाध्यक्षपदाच्या शर्यतीत खासदार राजीव सातव, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, मंत्री यशोमती ठाकूर, विधानसभा अध्यक्ष नाना पाटोले, मंत्री विजय डेट्टीवार आदी नेत्यांची नावे आहेत.
तर, आज मंत्री अशोक चव्हाण हे मंत्री विजय वडेट्टीवार यांच्यासह दिल्ली दौऱ्यावर गेले आहेत. २५ जानेवारीला मराठा आरक्षणावर सर्वोच्च न्यायालयातील खंडपीठासमोर होणाऱ्या सुनावणीसंदर्भात वकीलांशी चर्चा करण्यासाठी चव्हाण दिल्लीला आल्याचे सांगण्यात येत आहे. यासंदर्भात त्यांनी स्वतः माहिती दिली आहे. दरम्यान त्यांच्या या दिल्ली दौऱ्यावर शिवसंग्रामचे नेते व आमदार विनायक मेटे यांनी खोचक टीका केली आहे.
मराठा आरक्षणाच्या बैठकीच्या नावाखाली चव्हाण हे दिल्लीत पक्षाची मोर्चेबांधणी करत आहे. राजीव सातव हे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष होण्याची शक्यता आहे. तशी राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. त्यामुळे सातव हे प्रदेशाध्यक्ष होऊ नयेत यासाठी चव्हाण दिल्लीत गेले आहेत. काँग्रेस नेते राहुल गांधींकडे ते लॉबिंग करत आहेत, असा घणाघात विनायक मेटे यांनी केला आहे.
दरम्यान, अशोक चव्हाण यांनी खासदार बाळू धानोरकर, काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाच्या शर्यतीत असलेल्या विजय वडेट्टीवार यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या दिल्लीतील निवासस्थानी जाऊन भेट घेतली आहे. यावेळी, काँग्रेसमधील बदलावर चर्चा झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
महत्वाच्या बातम्या
- मराठा आरक्षणाचा तिढा सोडवण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं पंतप्रधान मोदींना पत्र !
- सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे शरद पवार यांनी केलं स्वागत ! म्हणाले…
- कृषी कायद्यांचा वाद सोडविण्यासाठी सुप्रीम कोर्टाने महाराष्ट्रातील ‘या’ झुंजार नेत्यावर सोपवली जबाबदारी
- राज ठाकरेंच्या हाताला दुखापत; फ्रॅक्चर लावून पक्षाच्या बैठकांमध्ये झाले सामील
- महापालिका निवडणुकांसाठी मनसेची व्यूहरचना; राज ठाकरेंनी दिले महत्वाचे आदेश