मराठ्यांसाठी मी केलं हे आपल्या वडिलांना विचारा ; मेटेंनी नितेश राणेंना झापलं

टीम महाराष्ट्र देशा : विनायक मेटे हे चायनीज मराठा असल्याचा घणाघात कॉंग्रेसचे आमदार नितेश राणे यांनी विनायक मेटेंवर केला होता. या टीकेने उद्विग्न होत विनायक मेटे यांनी नितेश राणेंचा चांगलाच समाचार घेतला आहे. वैचारिक उंची नसणाऱ्यांनी आम्हाला शहाणपण शिकवू नये, आम्ही काय केले, ते आपल्या वडिलांना विचारावे, असे मेटे म्हणाले आहेत.

दरम्यान, विनायक मेटे हे चायनीज मराठा आहेत. त्यांनी मराठा आरक्षणावर बोलूच नये. ते स्वत: मराठा आहेत का, अशी शंका वाटते, असे नितेश राणे यांनी म्हटले होते. राणेंच्या या विधानाच्या पार्श्वभूमीवर विनायक मेटे यांनी बीडमधील पत्रकार परिषदेत नितेश राणेंना प्रत्युत्तर दिले. त्यांनी नितेश राणेंचे थेट नाव घेतले नाही. ते म्हणाले, मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी गेल्या पंचवीस वर्षांपासून संघर्ष सुरू आहे. राज्य मागासवर्ग आयोगाच्या शिफारसी शासनाने स्वीकारल्या आहेत. मराठा समाजाला आरक्षणाची गरज असल्याचे मागासवर्ग आयोगाने नमूद केले आहे. लवकरच आरक्षणासंदर्भात निर्णय होईल.

मराठासह धनगर, मुस्लीम समाजालाही आरक्षण मिळावे यासाठी आम्ही आग्रही होतो आणि यापुढेही राहू असे त्यांनी सांगितले. सध्या कोणीही ऊठसुठ काहीही बोलत आहे. ज्यांची वैचारिक आणि शारीरिक उंची नाही ते आम्हाला शहाणपण शिकवत आहेत, असा टोला त्यांनी लगावला.

ब्राम्हण मुख्यमंत्रीच मराठ्यांना आरक्षण देऊ शकतो – विनायक मेटे

शरद पवार साहेबांवर टीका करण्याची मेटे यांची औकातच काय ? – अमरसिंह पंडीत

…. तर सरकार तातडीने विचार करेल : नारायण राणे