मराठा आरक्षणासाठी मागासवर्गीय आयोगाचा अहवाल लवकर प्राप्त होणे गरजेचे – मेटे

मुंबई : राज्यभरात सध्या मराठा आरक्षणाचा प्रश्न चांगलाच पेटला आहे. मराठ्यांना आरक्षण द्यावे या मागणीसाठी मराठा समाज आक्रमक झालाय. मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं ठिकठिकाणी ठोक अंदोलन करण्यात येतंय. दरम्यान मराठा आंदोलनाच्या मार्गावर तोडगा काढण्यासाठी काल मुख्यमंत्र्यानी सर्व पक्षीय बैठक बोलावली होती. या बैठकीला सर्व पक्षातील प्रमुख नेते हजर होते.

दरम्यान मराठी समाजाला आरक्षण मिळण्यासाठी मागासवर्गीय आयोगाने लवकरात लवकर अहवाल द्यावा. अशी विनंती त्यांना करावी, तसेच अहवाल प्राप्त झाल्यानंतर लगेच विशेष अधिवेशन बोलावं अशी मागणी आपण या बैठकीत केली होती. आणि ही मागणी मान्य देखील करण्यात आल्याची माहिती विनायक मेटे यांनी दिली.

पुढे बोलताना ते म्हणाले की, मराठी समाजाला लवकरात लवकर आरक्षण देण्यासाठी मागासवर्गीय आयोगाचा अहवाल त्वरीत येणे अपेक्षित आहे. अहवालानंतर आरक्षणाच्या टक्केवारीत वाढ करण्यासाठी सरकारने विशेष अधिवेशन बोलावं अशी मागणी आपण यापूर्वीही केली होती.आणि आताही या बैठकीत हीच मागणी केल्याचं विनायक मेटे यांनी सांगितले.

शरद पवार साहेबांवर टीका करण्याची मेटे यांची औकातच काय ? – अमरसिंह पंडीत

मराठा आरक्षण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून निर्णय जाहीर करा : सुरेश धस

You might also like
Comments
Loading...