राजकारणातील पत आणि प्रतिष्ठा गेल्याने विनायक मेटेंचे मानसिक संतुलन बिघडले

टीम महाराष्ट्र देशा : स्वत:ला स्वंयघोषित राष्ट्रीय नेते समजणाऱ्या आ.विनायक मेटे यांच्याकडे एकही लोक प्रतिनिधी आणि पदाधिकारी राहिलेला नाही. बीड जिल्ह्याच्या राजकारणातून पत आणि प्रतिष्ठा गेल्यामुळेच आ.मेटे यांचे मानसिक संतुलन बिघडले आहे. यामुळेच ते राज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजाताई मुंडे यांच्यावर बेछूट आणि पातळी सोडून आरोप करत आहेत. अशी टीका भाजपचे युवा नेते राजेंद्र म्हस्के यांनी केली आहे.

राज्याच्या ग्रामविकास मंत्री व जिल्ह्याच्या पालकमंत्री म्हणून पंकजा मुंडे यांनी जिल्ह्याच्या विकासासाठी भरीव निधी आणला. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून प्रत्येक गाव महामार्गाला जोडले गेले. एवढेच नव्हे तर जिल्ह्यामधून आठ राष्ट्रीय महामार्ग आणि दोन पालखी महामार्ग गेल्याने दळणवळणाच्या दृष्टीने मोठ्या सोयी उपलब्ध झाल्या आहेत.

तसेच बीड रेल्वेचे कामही अंतिम टप्प्यात असून बीड शहरालगत जाणारा धुळे-सोलापूर महामार्ग पुर्णत्वाकडे गेला आहे. या भौतीक सुविधांबरोबरच शेतकऱ्यांना विविध सवलती आणि अनुदान देण्यासाठीही पंकजाताईंनी सतत प्रयत्न केले आहेत. देशात सर्वात जास्त पिकविमा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळवून देण्यात पंकजाताई यशस्वी झाल्या आहेत.

त्यामुळे जिल्ह्यातील जनाधार त्यांच्या पाठीशी आहे असे असतानाही केवळ राजकीय विरोध म्हणून आ.विनायक मेटे यांनी गेल्या काही महिन्यांपासून आपले अस्तित्व अबाधित रहावे यासाठी पंकजाताईंना विरोध करत आहेत असे भाजपचे युवा नेते राजेंद्र म्हस्के यांनी म्हटले आहे.