विधानपरिषदेच्या कामकाज सल्लागार समितीवर विनायक मेटे

टीम महाराष्ट्र देशा : शिवसंग्रामचे संस्थापक, शिवस्मारक समितीचे अध्यक्ष आमदार विनायक मेटे यांना नव्या सरकारच्या एका समितीमध्ये संधी मिळाली आहे. विधानपरिषदेच्या कामकाज सल्लागार समितीवर ते विशेष निमंत्रित सदस्य असतील. सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी त्यांची नेमणूक केली.

विधानपरिषदेत सदस्य असलेल्यांमध्ये मेटे सर्वांत सिनिअर आहेत. मराठा महासंघाच्या माध्यमातून मराठा आरक्षण लढ्याच्या चळवळीतून पुढे आलेल्या मेटे यांना प्रथम युती सरकारमध्ये विधानपरिषदेवर संधी मिळाली. त्यानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांना पुन्हा तीनवेळा विधानपरिषदेवर संधी मिळाली.

Loading...

गतवेळी भाजपनेही त्यांना विधानपरिषदेवर घेतले. युती सरकारने त्यांना शिवस्मारक समितीचे अध्यक्ष केले होते. सध्याच्या नवीन सरकारमध्येही त्यांना विधानपरिषदेच्या कामकाज सल्लागार समितीवर स्थान मिळाली आहे. विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या समितीचे सदस्य आहेत. तीन विशेष निमंत्रितांत मेटे यांचा समावेश आहे.

महत्वाच्या बातम्या 

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

वारकरी संतापले ; उद्धव ठाकरे तुम्ही आषाढी एकादशीला शरद पवारांचाच अभिषेक करा
संज्याचं तोंड येरंडेल घेतल्यासारखं झालं असेल : निलेश राणे
दिल्लीत मोठ्या थाटात प्रचाराला गेलेल्या तावडेंना केजारीवालांनी बेक्कार झापलं
मंत्र्यांची तत्परता : वीरपत्नीच्या मदतीला धावले बच्चू कडू...
लोकप्रियतेत ‘तान्हाजी’चाच जयजयकार, अजय देवगन बनला नंबर 1 बॉलीवूड स्टार !!!
राजकीय पक्षांचा कोणताही बंद महाराष्ट्रातील व्यापारी यापुढे पाळणार नाहीत
शिवसेनेबाबतच्या 'त्या' वक्तव्यामुळे टीकेचे धनी झालेले चव्हाण आता म्हणतात...
'शाहीनबाग आंदोलनातील बहुतांश लोक हे पाकिस्तानी आणि बांगलादेशी'
यापेक्षा अधिक लोक तर गुरूद्वारामध्ये रोज लंगरमध्ये जेवतात, तेही मोफत
मशिदींना हात लावल्यास रिपब्लिकन पक्ष मुस्लिमांच्या पाठीशी उभा राहील - रामदास आठवले