fbpx

भैय्यूजी महाराज यांचा उत्तराधिकारी पारनेर तालुक्यातील

स्वप्नील भालेराव / पारनेर : दोन दिवसापूर्वी आत्महत्या केलेले राष्ट्रसंत भैय्यूजी महाराज यांनी त्यांच्या दुसऱ्या सुसाईड नोट मध्ये नमूद केल्या प्रमाणे माझे सर्व आर्थिक कारभार विनायक सांभाळेन अस आढळून आले आहे. हे विनायक दूधाडे मुळचे पारनेर तालुक्यातील लोणी हवेली गावचे आहेत.

विनायक यांचे वडील काशिनाथ दूधाडे हे आपल्या व्यवसायानिमित्त मध्यप्रदेशला गेले. व भैय्यूजी महारांच्या विचारांवर प्रभावित होऊन त्यांनीही तिथेच वास्तव केले नंतर विनायक दूधाडे की ज्याचे शिक्षण पारनेरच्या न्यु आर्टस् काॅमर्स महाविद्यालयात झालेला. वडलांसमवेत ते ही भैय्यूजी महाराजांच्या सानिध्यात गेल्याने त्यांच्या विचाराने प्रभावित झाले.

विनायक यांचा स्वभावात स्वज्वल,साधेपणा व नम्रपणा असल्याने भैय्यूजी महाराजांनी विनायक यांना आपल्याच कूटूंबातील सदस्य म्हणून समावून घेतले होते . विशेष म्हणजे त्यांना मानसपुत्र ही घोषित केले होते. विनायक यांचा शब्द म्हणजे भैय्यूजी महाराजांचा शब्द होता. त्यांचा भैय्यूजी महाराज यांचा उत्तराधिकारी म्हणून नामोल्लेख झाल्याने त्यांच्या नम्रपणाला दाद मिळाली आहे. व हीच चर्चा सध्या संपूर्ण पारनेर तालुक्यात सुरू आहे.

भैय्यूजी महाराज यांनी ज्या दिवशी आत्महत्या केली तेव्हा विनायक हे कामानिमित्त पुण्याला गेले होते. विनायक दूधाडे आपल्यावर सोपवलेल्या कारभारावर कीती ठाम राहतील व पूढे कशाप्रकारे उत्तराधिकारी म्हणून काम पाहतील याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.