आयपीएस विनय तिवारी क्वारंटाइनमुक्त,आजच बिहारला जाणार परत

ips vinay tiwari

मुंबई- सुशांतसिंह राजपूत याचा मुंबईत मृत्यू झाला होता. त्याच्या कुटुंबीयांनी बिहारमध्ये याबाबत एफआयआर नोंदवला आहे. त्याचा तपास करण्यासाठी बिहार पोलीस दलातील अन्य अधिकारी रस्ते, रेल्वे मार्गाने मुंबईत दाखल झाले आहेत. त्यानंतर आयपीएस अधिकारी विनय तिवारी विमानाने मुंबईत आले. केंद्र आणि राज्य सरकारच्या गाईडलाइनप्रमाणे आंतरराज्य विमानाने प्रवास करणाऱ्या प्रवाशाला १४ दिवस क्वारंटाइन केले जाते. या नियमानुसार तिवारी यांना क्वारंटाइन करण्यात आले.

मुंबई महापालिकेने त्यांना क्वारंटाईन संपवण्याची मुभा दिली आहे. तिवारींना बळजबरीने होम क्वारंटाईन केल्याचा आरोप बिहारचे पोलिस महासंचालक गुप्तेश्वर पांडे यांनी केल्यानंतर वाद निर्माण झाला होता. तिवारी यांना सात दिवसाच्या आत बिहारला परत जाण्याच्या अटीवर क्वारंटाइनमुक्त केले जाईल, असे मुंबई महापालिकेने बिहार पोलिसांना कळविले होते.

आता विनय तिवारी आज बिहारला परत जाणार आहेत. “बीएमसीने एसएमएसद्वारे मला कळवले आहे की मी होम क्वारंटाईन सोडून जाऊ शकतो. मी आता पाटण्याला रवाना होणार आहे” असे विनय तिवारी यांनी ‘एएनआय’ला सांगितले.

महत्वाच्या बातम्या नक्की वाचा –

मोठी बातमी: इंदुरीकर महाराजांची आज कोर्टात महत्वाची सुनावणी