दुसऱ्या जातीतील पुरुषासोबत अनैतिक संबंध ठेवले म्हणून गावकऱ्यांंनी महिलेला सुनावली अजब शिक्षा

टीम महाराष्ट्र देशा : एका आदिवासी विवाहित महिलेला अनैतिक संबंध ठेवल्याप्रकरणी पंचायतीने अजब शिक्षा सुनावल्याचे समोर आले आहे. पतीला खांद्यावर बसवून गावभर फिरवण्याची हि शिक्षा या महिलेला देण्यात आली. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल जोरदार झाला आहे. मध्य प्रदेशमधील झाबुआ जिल्ह्यातील देवीगावात हा प्रकार उघडकीस आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, साधारण ३० वर्षीय महिलेचे गावातील एका दुसऱ्या जातीतील पुरुषाबरोबर अनैतिक संबंध होते. याबद्दल तिच्या पतीला व सासरच्यांना समजल्यावर त्यांनी तिला घराबाहेर काढले. त्यानंतर हे प्रकरण पंचायतीत गेले. दोन्ही बाजू ऐकल्यानंतर पंचांनी महिलेने पतीला खांद्यावर बसवून संपूर्ण गावात फिरवण्याची शिक्षा दिली. पंचायतीने महिलेला दिलेली ही शिक्षा कायद्याविरोधात असून महिलेचा अपमान करणारी आहे. यामुळे व्हायरल झालेल्या व्हिडीओच्या आधारे आरोपींवर योग्य ती कारवाई केली जाईल असे येथील पोलीस अधीक्षक विनित जैन यांनी सांगितले आहे.