अमरावती : राज्यात राजकीय नेत्यांवर ईडीचे धाडसत्र सुरु आहे. त्यामुळे महाविकास आघाडी आणि भाजप यावरून रोज आमने-सामने येत आहेत. यावर बोलताना वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर संतापले असताना पाहायला मिळाले. देशात भाजपने दडपशाहीचे राजकारण सुरू केलं आहे. उठ सूट कोणालाही ईडीच्या नोटीस दिल्या जात आहेत. भाजपाने देशात मोकळं वातावरण ठेवलं नाही, गां*** दम असेल मला उचलून दाखवा, अशाप्रकारे ईडीच्या कारवाईवरून प्रकाश आंबेडकरांची माध्यमांशी बोलताना जीभ घसरली.
ओबीसी आरक्षण मध्य प्रदेशात लागू झाले. मग महाराष्ट्रात का नाही? यावर प्रकाश आंबेडकर म्हणाले, यासंदर्भात मी दोन दिवसांत स्वतंत्र भूमिका मांडणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार हे पत्रकारांशी संवाद साधतात. पण त्यांनी त्याऐवजी वकिलांशी खुली चर्चा करावी. त्यातून काहीतरी मार्ग निघेल. ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका घ्यायला नकोत, यावरही मत प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केले आहे.
त्याचसोबत ते म्हणाले, राज्यातील राजकीय पक्ष हे गुलाम झाले आहेत. त्यांनी वकिलांशी चर्चा करून त्यातून मार्ग काढावा. श्रीमंत मराठा गरिबांशी इमानदारी राखू शकत नाही. राज्यात महानगरपालिका व जिल्हा परिषदेच्या होऊ घातलेल्या निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांना पूर्णपणे स्वायतत्ता दिली आहे की त्यांनी कोणासोबत युती करावी,ते त्या-त्या जिल्ह्यातील पदाधिकारी ठरवणार आहेत. त्याप्रमाणे त्याच्या जिल्ह्यात युती केली जाईल अशी भूमिका देखील वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी आहे.
महत्वाच्या बातम्या –