ग्रामपंचायतीसाठी आता ‘ग्राम विद्युत व्यवस्थापक’ : चंद्रशेखर बावनकुळे

नागपूर : राज्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीसाठी आता ‘ग्राम विद्युत व्यवस्थापक’ नेमण्यात येणार असल्याची घोषणा ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेत केली.

विधानसभेत सदस्यांनी नियम 293 अन्वये प्रस्तावावर चर्चा उपस्थित केली. त्याला उत्तर देताना बावनकुळे बोलत होते. ते म्हणाले, ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना सुरळीतपणे विद्युत पुरवठा आणि वीज बिलांबाबतची समस्या सोडविण्यासाठी राज्यातील 23 हजार ग्रामपंचायतीमध्ये ‘एक ग्रामपंचायत, एक आयटीआय विद्यार्थी’ हा उपक्रम राबवून प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये आयटीआय इलेक्ट्रिकल झालेल्या विद्यार्थ्याची ग्राम विद्युत व्यवस्थापक म्हणून नेमणूक करण्यात येणार असून त्यांना प्रशिक्षणही देण्यात येणार आहे.

दोन लाख 50 हजार शेतकऱ्यांना नवीन वीज जोडणी देणार

राज्यात थकित वीजबिलामुळे कोणत्याही शेतकऱ्यांचे वीज जोडणी कट केलेले नसून यापुढील काळात दोन लाख 50 हजार शेतकऱ्यांना नवीन वीज जोडणी देणार आहे, असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. त्याचबरोबर यापूर्वी वीज निर्मितीसाठी शेतकऱ्यांसाठीचे पाणी आणि पिण्याचे पाणी वापरता येणार नाही.

त्यामुळे सांडपाण्यावर वीजनिर्मिती करण्याची योजना राबविण्यासाठी राज्य सरकार प्रयत्न करीत आहे. तसेच राज्यातील उद्योगांना छत्तीसगडपेक्षा दोन रुपये कमी दराने वीज पुरवठा करण्यात येत असल्याची माहितीही बावनकुळे यांनी उत्तरात दिली.

यावेळी विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे-पाटील, दिलीप वळसे-पाटील, अजित पवार, जयंत पाटील आदींनी चर्चेत सहभाग घेतला होता.

‘सौभाग्य’ योजनेंतर्गत महाराष्ट्रातील ८ हजार ८२० घरांना वीज जोडणी

You might also like
Comments
Loading...