उंडाळकर काकांनी घेतली पृथ्वीराज बाबांची भेट, मुलासाठी विधानपरिषदेची साखर पेरणी ?

chavhan - undalkar

कराड : कराडच्या राजकारणातील दोन मोठे प्रस्थ एक म्हणजे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज (बाबा) चव्हाण आणि दुसरे म्हणजे माजी मंत्री विलासराव पाटील उंडाळकर (काका). दोन्हीही कॉंग्रेसचे दिग्गज नेते मात्र अस असून देखील दोघांमध्ये विळ्या भोपळ्याचे सख्य. या दोन बड्या हाडवैऱ्यांची सोमवारी भेट झाल्याने जिल्ह्यातील कॉंग्रेसला उर्जितावस्था मिळेल अशी चर्चा आहे. मात्र दुसरीकडे उंडाळकर काकांचे चिरंजीव ऍड. उदयसिंह पाटील उंडाळकर यांना विधनपरिषदेच्या सदस्यत्वाची संधी मिळावी यासाठी साखर पेरणी करण्यासाठी ही भेट असल्याचं बोललं जात आहे.

काका- बाबा गटाचे अनेक वर्षांचे हाडवैर संपूर्ण राज्याला माहित आहे. मात्र, गेल्या काही वर्षात राजकारणात प्रभावी असलेल्या नेत्यांना प्रत्यक्ष- अप्रत्यक्ष एकमेकांची मदत घ्यावी लागली. काका- बाबा गटाच्या संघर्षाला ज्यांच्यामुळे सुरूवात झाली, ती मंडळी दोन्ही गटांतून बाहेर पडली आणि काका- बाबा गटाच्या मनोमिलनाला खऱ्या अर्थाने सुरूवात झाली. त्यानंतरच्या प्रत्येक निवडणुकीत दोन्ही गटांचे सैन्य खांद्याला खांदा लावून लढले. यादरम्यान, पृथ्वीराज बाबांसाठी प्रतिष्ठेच्या ठरलेल्या मलकापूर नगरपालिका आणि 2019 ची विधानसभा या निवडणुकांत काका गटाने बाबा गटाला मदतच केल्याची चर्चा आहे.

शिवसेनेच्या सत्तेला सोडण्याची क्षमता काँग्रेसमध्ये नाही – सुधीर मुनगंटीवार

पृथ्वीराज चव्हाण यांच्या विधानसभा निवडणुकीतील विजयात काका गटाने किंगमेकरची भूमिका बजावल्याची चर्चा होती. कराड, मलकापूर सोडून बाहेरची मतविभागणी करण्यासाठी पृथ्वीराजबाबांनी ऍड. उदयसिंह पाटील यांना उमेदवारी अर्ज भरायला सांगितला आणि विधान परिषदेच्यावेळी उदयसिंह पाटील यांच्या उमेदवारीचा विचार केला जाईल, असा शब्दही दिल्याची चर्चा होती. काका- बाबा भेटीने या चर्चेने पुन्हा उचल खाल्ली आहे. जिल्ह्याला अजून एक आमदार मिळणार या चर्चेने काका- बाबा गटात उत्साहाचे वातावरण आहे.

माझी सध्या मुंबईत यायची हिंमत नाही – नितीन गडकरी

IMP