‘महाराष्ट्राच्या विकासात विलासराव देशमुखांचे मोठे योगदान!’

vilasrao deshmukh
Maharashtra's development!

अहमदनगर: स्व.विलासराव देशमुखांनी आपल्या कार्यकर्तृत्वातून राज्यात नव्हे तर देशात वेगळा ठसा उमटविला.विकासात्मक कामातून तळागाळातील सर्व सामान्य जनतेचे प्रश्‍न प्राधान्याने सोडवून अनेक लोक कल्याणकारी योजना राबविल्या.कायम हसतमुख व बहुआयामी व्यक्तीमत्व असलेल्या स्व.विलासराव देशमुख यांचे राज्याच्या विकासात मोठे योगदान प्रतिपादन आमदार डॉ.तांबे यांनी केले आहे.माजीमंत्री आ. बाळासाहेब थोरात यांच्या यशोधन संपर्क कार्यालयात आयोजित अभिवादन कार्यक्रमात ते बोलत होते.या वेळी नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे,बाबा ओहोळ,विश्‍वासराव मुर्तडक,अजय फटांगरे,भाऊसाहेब कुटे,नितीन अभंग,नवनाथ अरगडे,आर. एम.कातोरे,सिताराम राऊत,ढोले गुरुजी,प्रा.बाबा खरात,सुभाष सांगळे,बाळासाहेब पवार,बंटी साळवे,सोपान खेमनर,भारत गुंजाळ आदि मान्यवर उपस्थित होते.आमदार डॉ.तांबे म्हणाले की,राज्यात विविध विकास योजना राबवितांना सर्वसामान्य जनतेच्या हिताच्या निर्णयाला प्राधान्य देवून सर्वांना बरोबर घेवून काम करण्याची त्यांची पध्दत विशेष लोकप्रिय होती.राजकारणाबरोबरच कला, क्रीडा,साहित्य,नाटय,सांस्कृतिक क्षेत्रात त्यांनी आपल्या कार्यपध्दतीतून चाहता वर्ग निर्माण केला.प्रत्येक विषयाचे सखोल प्रभुत्व, कलागुण संपन्न व्यक्तीमत्व यामुळे स्व.विलासराव देशमुख रायाच्या राजकारणात नेहमीच अग्रभागी राहिले.राज्याचे नेतृत्व करत असतांना सर्वच राजकीय पक्षातील नेत्यांशी त्यांनी आपल्या कार्यपध्दतीतून जिव्हाळ्यााचे संबंध निर्माण केले.राजकारणापलीकडे दिलखुलास व्यक्तीमत्व म्हणून स्व.विलासराव देशमुख संपूर्ण रायाला परिचीत होते.सतत कार्यमग्न राहून आलेल्या प्रसंगाना आपल्या खास शैलीतून सामोरे त्यांची पध्दत वैशीष्टे पूर्ण होती.देशपातळीवरच्या राजकारणात एक वेगळा ठसा त्यांनी उमटविला.नगर जिल्ह्या बरोबरच संगमनेर तालुक्यावर कायम त्यांनी प्रेम केले.आमदार बाळासाहेब थोरात यांना अगदी परिवारातील सदस्य मानून सुख दुखात सामील करुन स्व.विलासराव देशमुखांनी मोठ्या भावाचे प्रेम दिले.तालुक्याच्या विकासकामांत मोठी मदत केली असल्याचे ही ते म्हणाले.दुर्गाताई तांबे म्हणाल्या की,दिलखुलास व्यक्तीमत्व,अफाट स्मरणशक्ती,कामाचे अकलन करुन त्वरीत निर्णय घेण्याची पध्दत यामुळे ते लोकप्रिय नेते ठरले.आधुनिक महाराष्ट्राच्या जडण घडणीत त्यांचा मोलाचा वाटा आहे.काँग्रेस पक्षाचा सर्वांना भावणारा असा लोकप्रिय नेता ही त्यांची ओळख कायम स्मरणात राहणारी आहे. स्व. विलासराव देशमुख यांनी कायम आपल्या तालुक्यावर प्रेम केले आहे.आमदार बाळासाहेब थोरात यांच्यावर लहान भावासारखे प्रेम केले. आमदार बाळासाहेब थोरात यांच्या नेत्वृत्वाखाली संगमनेर तालुका विकासाचे मॉडेल ठरला आहे.यापुढे ही सर्वांनी विकासाच्या पाठिशी उभे रहावे असे आवाहन ही त्यांनी यावेळी केले. यावेळी तालुक्यातील विविध संस्थांचे पदाधिकारी,संचालक,काँग्रेस कार्यकर्ते,युवक मोठया संख्येने उपस्थित होते.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक बाबा ओहोळ यांनी केले. नामदेव कहांडळ यांनी सुत्रसंचालन केले.विश्वासराव मुर्तडक यांनी आभार मानले.

2 Comments

Click here to post a commentLoading…
Loading...