बाजार समिती निवडणूकीतून विलास पाटील यांनी का घेतली माघार?

करमाळा – शिवसेनेचे आमदार नारायण पाटील यांचे चुलत बंधू आणि करमाळा पंचायत समितीचे माजी सदस्य विलास पाटील यांनी करमाळा बाजार समिती निवडणूकीतून माघार घेतली असून आता तालुकाभर उलट-सुलट चर्चेला उधाण आलेले आहे.

काही दिवसांपूर्वी आमदार नारायण पाटील यांची साथ सोडून पंचायत समितीचे माजी सदस्य विलास पाटील यांनी जि प अध्यक्ष संजय शिंदे यांच्या गटात करमाळा तालुक्यातील जेऊर येथे शक्ती प्रदर्शन करून जोरदार प्रवेश केला होता. तसेच सध्या सुरू असलेल्या बाजार समिती निवडणूक कोणत्याही परिस्थितीत लढण्याचा निश्चय केलेला होता.
विलास पाटील यांनी बाजार समितीच्या वांगी गणातून उमेदवारी अर्ज दाखल केलेला होता परंतु अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी त्यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला असून निवडणूक न लढण्याचा निर्णय घेतला असल्यामुळे नक्की कशामुळे माघार घेतली म्हणून सध्या तालुकाभर चर्चेला उधान आलेले आहे.

संजय शिंदे यांच्या आदेशामुळे माघार.

बाजार समिती निवडणूकीतून माघार घेण्यासाठी आपल्याला जि प अध्यक्ष संजय शिंदे यांनी सांगितले म्हणून मी माझी उमेदवारी मागे घेतली असून संजय मामा जे निर्णय घेतील तोच आपण मान्य करणार असल्याचे माजी पं.स सदस्य विलास पाटील यांनी महाराष्ट्र देशाशी बोलताना सांगितले.

जयवंतराव जगताप यांच्यासाठी माघार

विलास पाटील यांनी ज्या वांगी गटातून माघार घेतली त्या गटातून माजी आमदार जयवंतराव जगताप पाटील-जगताप युतीकडून निवडणूक लढवित असल्यामुळे विलास पाटील यांनी माघार घेतल्याचे बोलले जात आहे.

You might also like
Comments
Loading...