जे गडकरींना ग्लासातून पाणी आणून द्यायचे. त्याच मोदींना गडकरी का घाबरतात ? – विलास मुत्तेमवार

टीम महाराष्ट्र देशा : जेव्हा मोदी मुख्यमंत्री होते तेव्हा गडकरी राष्ट्रीय अध्यक्ष होते. त्यावेळी मोदी गडकरींना ग्लासातून पाणी आणून द्यायचे.मग आता त्याच मोदींना गडकरी घाबरु लागले आहेत. नोटाबंदीच्या निर्णयावेळी एका शब्दानं हे लोकं त्यांना काही बोलले नाही ? असा टोला कॉंग्रेसचे नेते विलास मुत्तेमवार यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना लावला आहे.

त्याचबरोबर, ‘हुकूमशाही गाजवणाऱ्या नरेंद्र मोदींनी नोटाबंदी जाहीर करताना नितीन गडकरी यांच्यासह अनेक मोठ्या मंत्र्यांना एका खोलीत डांबून ठेवले होते. त्यावेळी मग गडकरींनी विरोध का केला नाही?, असा खळबळजनक आरोप सुधा मुत्तेमवार यांनी केला आहे.

नागपूरमध्ये नोटाबंदीच्या वर्षपूर्तीनिमित्त काँग्रेसतर्फे आक्रोश मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी बोलताना विलास मुत्तेमवार यांनी भाजपवर शेलक्या शब्दात टिका केली आहे.

 

You might also like
Comments
Loading...