‘मराठा आरक्षणाचे खरे मारेकरी शरद पवार, त्यामुळे मोदींना पत्र लिहिण्याऐवजी पवारांना पत्र लिहा’

vikrant patil vs maheboob shekh

 मुंबई – राज्यात सध्या मराठा आरक्षणाचा मुद्दा गाजत असून नुकतीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट देखील घेतली आहे. आता मराठा समाजाला’ आरक्षण मिळावे यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या २२ व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने राष्ट्रवादी युवक काँग्रेस “एक पत्र मराठा युवकांच्या उज्वल भविष्यासाठी” ही मोहीम राबवत असल्याची माहिती राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांनी दिली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आजपर्यंत सर्व घटकांचा विचार केला आहे आणि करत आहे. हाच धागा पकडत व पक्षाचा विचार लक्षात घेऊन वर्धापन दिनी ही मोहीम राज्यभर राबविली जात आहे असेही मेहबूब शेख म्हणाले.’मराठा समाजाला’ आरक्षण मिळावे म्हणून राष्ट्रवादी युवक काँग्रेस एक कोटी पत्र देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठवणार आहे. आपण सुद्धा युवकांच्या उज्वल भविष्यासाठी एक पत्र लिहावे असे आवाहन मेहबूब शेख यांनी केले आहे.

दरम्यान, राष्ट्रवादीच्या या उपक्रमावर भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील यांनी शेलक्या शब्दात समाचार घेतला आहे. ‘महाराष्ट्र देशा’ला दिलेल्या प्रतिक्रियेत ते म्हणतात, मराठा आरक्षणाचे खरे मारेकरी हे खा. शरद पवार आणि महाविकास आघाडीचे नेते आहेत त्यामुळे मोदींना ही पत्र पाठवण्यापेक्षा सिल्व्हर ओक या पवारांच्या निवासस्थानी ही पत्रे पाठवावीत असा सल्ला पाटील यांनी लगावला आहे. महाविकास आघाडीने योग्य भूमिका घेतली असती तर सुप्रीम कोर्टात आरक्षण टिकले असते असे देखील ते म्हणाले.

आपलं गणित चुकलेले आहे हे आता आघाडीच्या लक्षात असून जनतेला कन्फ्युज करण्याचे काम सुरु आहे.  महेबूब शेख हे बलात्काराच्या गुन्ह्यातील आरोपी आहेत. अशा व वृत्तीच्या व्यक्तीने देशाला तारणाऱ्या मोदींना पत्र लिहिण्याऐवजी पवारांना पत्र लिहावे असा टोला देखील लगावला आहे.

महत्वाच्या बातम्या

IMP