मटका व्यवसायात वडिलांनी जिव गमवला, मुलागा जिद्दीने लढून नायब तहसीलदार बनला

vikrant deputy-tehsildar

अमरावती : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून 2019 मध्ये घेण्यात आलेल्या राज्यसेवा मुख्य परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर झाला आहे. साताऱ्याचा प्रसाद चौघुलेने राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. तर उस्मानाबादचा रवींद्र शेळके मागासवर्गात प्रथम आला आहे. याशिवाय अमरावतीची पर्वणी पाटील महिलांमध्ये राज्यात प्रथम आली आहे. तर अहमदनगरचा दादासाहेब दराडे याने देखील शेतकरी कुटुंबातून येत प्रतिकूल परिस्थितीवर मात करत गरुडझेप घेतली आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने 13 ते 15 जुलै 2019 या दरम्यान 420 पदांसाठी राज्यसेवा मुख्य परीक्षा घेतली होती. जवळपास वर्षभराने आज या परीक्षेचा निकाल जाहीर झाला. उमेदवारांच्या माहितीसाठी हा निकाल आणि प्रत्येक पवर्गासाठी शिफारसपात्र ठरलेल्या शेवटच्या उमेदवाराचे गुण अर्थात कट ऑफ मार्क्स आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहेत.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने १३ ते १५ जुलै २०१९ रोजी ४२० पदांसाठी एमपीएससीची परीक्षा घेतली होती. तर पूर्व परीक्षा १७ फेब्रुवारी २०१९ रोजी मुंबईसह अन्य ३७ जिल्हा केंद्रावर घेण्यात आली होती. पूर्व परीक्षेकरता ३,६०,९९० उमेदवारांना प्रवेश देण्यात आला होता. यातून मुख्य परीक्षेकरता ६,८२५ उमेदवार अर्हताप्राप्त ठरले होते.

यामधे बारामती शहरातील युवकाने स्पर्धा परीक्षेत मिळविलेले यश चर्चा आणि कौतुकाचा विषय ठरले आहे. चित्रपटात शोभणारी ही कहानी तितकीच प्रेरणादायी आणि खडतर संघर्षमय आहे. ही सत्य कथा शहरातील एका ‘मटका’ व्यावसायिकाच्या मुलाचे आहे. विक्रांत कृष्णा जाधव असे या २९ वर्षीय युवकाचे नाव आहे. नुकत्याच जाहिर झालेल्या एमपीएससी परीक्षेत विक्रांत याची नायब तहसिलदार पदी निवड झाली आहे.

बारामती शहरातील कृष्णा जाधव हे मटका व्यावसाय चालवत असत, त्यांचा दोन वर्षांपूर्वी खून झाला आहे. त्याच जाधव यांच्या घरात जन्मलेल्या विक्रांत यांनी भटक्या विमुक्त जाती मधून घरची परिस्थिती व वातावरण नसताना आकाशाला गवसणी घालणारे यश मिळविले.

विक्रांत यांचे वडील मटका व्यावसायिक असले तरी त्यांनी मुलाला नेहमीच उच्च शिक्षण,उच्च पदाची स्वप्न दाखविली. मटका व्यवसायाचा घरावर परिणाम न होण्याची दक्षता घेतली. मुलावर योग्य संस्कार होतील याची काळजी घेतली.घरच्या आसपास सगळा गोंधळ, विचित्र लोक असताना वडिलांनी याचा कुटुंबाला कधी त्रास होऊ दिला नाही.त्यामुळे विक्रांत यांनी लहानपणापासुनच वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली.त्याने आपल्या वडिलांची इच्छा पूर्ण करण्याच्या जिद्दीवर व प्रामाणिक कष्टाच्या जीवावर व आई व लहान भावाच्या पाठिंब्यावर नायब तहसीलदार पदी झेप घेतली आहे.

परिस्थितीला पायाशी झुकवलं, भंगार विक्रेत्याचा मुलगा झाला नायब तहसीलदार

सुरुवातीपासुनच वडिलांनी प्रोत्साहन दिल्याने स्पर्धा परीक्षेचा अभ्यास सुरू केला. सुरुवातीला वकिली पेशात प्रवेश करायचे ठरवलेल्या विक्रांत यांनी वडिलांच्या इच्छेसाठी स्पर्धा परीक्षेची बिकट वाट निवडली. मात्र, पहिल्या प्रयत्नात त्याला अपयश आले.

२०१७ मध्ये जोमाने ध्येय पूर्ण करण्याच्या उद्देशाने रोज १० -१२ तास अभ्यास सुरू केला .२०१८ साली सहाय्यक कक्षाधिकारी म्हणून भटक्या विमुक्त जाती प्रवगार्तून राज्यात पहिला क्रमांकावर निवड झाली. ५ नोव्हेंबर २०१८ साली मटका व्यवसायाच्या वादातून वडिलांचा खून झाला. त्यानंतर अवघ्या चार महिन्यांनी १९ मार्च २९१९ ला विक्रांत यांची मंत्रालयात सहायक कक्ष अधिकारी पदावर निवड झाली. मुलाला अधिकारी म्हणुन घडविण्याचे स्वप्न पूर्ण झालेले पाहण्यासाठी वडील हयात नव्हते. मात्र,आई आणि लहान भावाने पाठिंबा दिला.त्यामुळे ते दु:ख विसरून चांगला प्रयत्न करत आणखी मोठे पद मिळविण्यासाठी त्यांनी प्रयत्न सुरु केले. शुक्रवारी लागलेल्या निकालात नायब तहसीलदार पदी निवड झाली आहे.विक्रांत यांचे म ए सो हायस्कूल मध्ये प्राथमिक शिक्षण झाले असून टी.सी कॉलेज मधून कॉमर्स मधून पदवी मिळवली आहे.

विक्रांत सध्या सहाय्यक कक्षा अधिकारी पदावर रुजू आहेत. तसेच भविष्यात उपविभागीय पोलीस अधिकारी पदी विराजमान होण्याचा मानस विक्रांत यांनी बोलून दाखवला. भविष्यात यासाठी चांगला अभ्यास व प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. स्पर्धा परीक्षेचा सगळा अभ्यास घरीच केला .यासाठी वेगवेगळे प्रयोग करत स्वत:च चुका सुधारत गेल्याचे विक्रांत यांनी सांगितले.स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी विद्यार्थ्यांनी प्रामाणिक प्रयत्न करावा. आपल्या अडचणींवर मात करावी जिद्द,चिकाटी,आत्मविश्वास असणे गरजेचे आहे.आपली दु:ख उगाळत न बसता विद्यार्थ्यांनी चांगला प्रयत्न केल्यास नक्कीच यश मिळेल असे जाधव यांनी सांगितले.

‘शेतकऱ्यांचे कर्जवाटप होण्यासाठी सोमवारपासून भाजपाचे राज्यव्यापी आंदोलन’