पुणे: बॅरिस्टर हे नाटक विक्रम तू बसवं मी त्यात काम करेन, अशी इच्छा नाना पाटेकर यानी व्यक्त केली. तसेच नटसम्राट जर विक्रम गोखले यांनी केला असता तर आतापेक्षा कितीतरी पटीने छान झाला असता. असेही ते म्हणाले.
संवाद पुणे आणि महाराष्ट्र सहित्य कला पसीरिणी सभा यांच्या तर्फे दादासाहेब फाळके आणि त्यांच्या पहिल्या चित्रपटाच्या सन्माणार्थ ३ मे हा दिवस देशात प्रथमच कला दिवस म्हणून साजरा करण्यात आला. या निम्मित संवाद मराठी चित्रपटाचा या मराठी चित्रपट संमेलन चे आयोजन करण्यात आले होते.
दरम्यान, विक्रम गोखले म्हणाले ‘मी गेली ३० वर्षे जायबंदी झालेल्या जवानांची सेवा करत आहे. नाना शेतकऱ्यांसाठी काम करत आहे मात्र शेतकऱ्यांच्या मनात घुसून आत्महत्या करण्यापासून प्रवृत्त करण्याचं काम नानाने करावं. सरकार आपलं काम करत राहील मात्र नाना आणि मकरंद या दोघांनी जर हे काम केलं तर अतिशय चांगलं काम होईल.
यावेळी जेष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांना त्यांच्या चित्रपट सृष्टीतील सुवर्ण मोहत्सवी कारकिर्दीनिमित्त अभिनेते नाना पाटेकर यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. त्यांच्या सोबत विजय कुवळेकर, वामन केंद्रे, पी डी पाटील , मनोज जोशी उपस्थित होते.
Add Comment