‘राज ठाकरे यांची भाषणं ही केवळ मनोरंजनासाठी ऐकावी’

टीम महाराष्ट्र देशा : परखड मत मांडणारे जेष्ठ अभिनेते विक्रम गोखले पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. काही दिवसांपूर्वी लोकशाहीची गळचेपी होते आहे असं म्हणणाऱ्यांचं थोबाड फोडलं पाहिजेम असे वक्तव्य गोखले यांनी केले होते, आता मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्यावर केलेल्या टिपण्णीमुळे ते पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.

मनसे प्रमुख राज ठाकरे यांची भाषणं ही केवळ मनोरंजनासाठी ऐकावी आणि टाळ्या वाजवाव्या, अशी प्रतिक्रिया विक्रम गोखले यांनी दिली. एबीपी माझाच्या कट्ट्यावर त्यांना राज ठाकरे यांच्या सभांविषयी प्रश्न विचारला असता त्यांनी राज ठाकरेंची भाषणं केवळ मनोरंजनासाठी असल्याचे म्हटले आहे.

राज ठाकरेंचे व्हिडीओ किती खरे आणि किती खोटे आहेत, याबाबत कल्पना नाही. मात्र मनोरंजनासाठी राज ठाकरेंची भाषण बघावी आणि टाळ्या वाजवाव्यात. राज ठाकरे हे छोटे आहेत. त्यांनी दाखविलेले व्हिडीओ किती खरे किती खोटे आहेत हे तपासण्याची यंत्रणा आपल्याकडे आहे, असे गोखले म्हणाले.