कर्जमुक्तीचे गाजर तुमचे थापा तुम्ही हाणा,बळीराजा हा तयार आता,मोडाया तुमचा कणा- विखे पाटील

अर्थमंत्र्यांच्या कवितांना विखे पाटील यांचेही चोख काव्यात्मक प्रत्युत्तर

मुंबई: राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी यंदाचाअर्थसंकल्प सादर करताना कवितांचा मनमुराद वापर करून सरकारचे गोडवे गात विरोधकांवर शरसंधान केले होते. विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज अर्थमंत्र्यांना चोख काव्यात्मक प्रत्युत्तर दिले.

विखे पाटील यांनी आज अर्थसंकल्पावरील चर्चेमध्ये अर्थमंत्र्यांच्या अनेक कवितांचा कवितांमधूनच समाचार घेतला.यंदाच्या अर्थसंकल्पाला हजारो शेतकरी आत्महत्या, वयोवृध्द शेतकरी धर्मा पाटील यांची आत्महत्या, हजारो कुपोषित बालकांचे मृत्यू, कमलामील अग्नितांडवातील १४ निरपराधांचे बळी, अशीपार्श्वभूमी होती. तरीही अर्थमंत्र्यांना कविता सूचत होत्या, हे दुर्दैव असल्याचे ते म्हणाले. आचार्य अत्रेंच्या ओळींमध्ये थोडा बदल करून त्यांनी अर्थमंत्र्यांना सुनावले की,

“मुले पुरताना चिता पेटताना,
सूचती मनी कविता किती नाना”

यंदाचा अर्थसंकल्प म्हणजे मुशायरा किंवा कवी संमेलनभासत होते. अर्थमंत्री एक चांगले कलाकार आहेत. त्यांच्या कविता वाचनासाठी एखादे विशेष अधिवेशनबोलावायला हरकत नाही, अशा मार्मिक शब्दांत विखे पाटील यांनी अर्थमंत्र्यांना चिमटे काढले. अर्थमंत्र्यांनी आपल्या भाषणात कवी कालिदासांचा उल्लेख केला. परंतु, त्यांचा आवेश असा होता की, कवीकालिदासानंतर जणू आपले सुधीरदासच; आणिकालिदासांच्या मेघदूतानंतर सुधीरदासांचाअर्थसंकल्पच, अशी परिस्थिती असल्याचे विरोधी पक्षनेते पुढे म्हणाले.

सरकारने तीन वर्षे केवळ घोषणा आणि आश्वासनांचा पाऊस पाडला. परंतु, आता जनतेला वस्तुस्थिती उमगल्याने सरकारला आपली बाजू सावरण्यासाठीकविता, शेरोशायरीचा आधार घ्यावा लागत असल्याचे विरोधी पक्षनेत्यांनी सांगितले. यावेळी राधाकृष्ण विखे पाटील यांनी अनेक कविता सांगत सरकारच्या नियोजनशून्य लोकविरोधी कारभाराचे वाभाडे काढले.अर्थमंत्र्यांनी अर्थसंकल्पीय भाषणाच्या प्रारंभी सरकारचेसंकल्प व्यक्त करताना सांगितले होते,

“परिवर्तन का ज्वार लाये है,
सबका साथ, सबका विकास लिये
महाराष्ट्र को उभार रहे है”

त्यावर विखे पाटील यांनी अर्थमंत्र्यांच्या कवितेत बदल करत महाराष्ट्राची वस्तुस्थिती सांगणाऱ्या नवीन ओळी सुनावल्या.
“आत्महत्याओं का ज्वार लाये है,
जनता का घात, मंत्रियो का विकास किये
ये तो महाराष्ट्र को डुबा रहे है”

भाजप-शिवसेनेचे सरकार शेतकरी हिताचा असल्याचा दावा करताना मुनगंटीवार म्हणाले होते,

“शेतकरी हा कणा आमुचा, हित तयाचे पाहू
अडी-अडचणी कितीही येवो, सोबत त्यांच्या राहू,
विहीरी देऊ, सिंचन देऊ, देऊ शेततळे
वचन आमचे प्राणपणाने हे नाते आम्ही निभाऊ”

परंतु, प्रत्यक्षात या सरकारची शेतकऱ्यांबाबतची अनास्था वारंवार दिसून आल्याचे राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले,

“विहीरी सांगा, सिंचन सांगा, सांगा शेततळे,
बोलाचीच कढी तुमची, उधळा मुक्ताफळे,
कर्जमुक्तीचे गाजर तुमचे थापा तुम्ही हाणा,
बळीराजा हा तयार आता, मोडाया तुमचा कणा”

अर्थसंकल्पीय भाषणात सुधीर मुनगंटीवार यांनी प्रमोद महाजन कौशल्य विकास योजना कमालीची यशस्वी ठरल्याचे सांगितले होते. त्याविषयी ते म्हणाले होते की,
“नसो कुणाच्या चेहऱ्यावरती दु:खाचा अंधार,
अन् तारुण्याच्या खांद्यावरती बेकारीचा भार,
कौशल्याचा विकास देऊ रोजगाराची हमी,
मिळेल साऱ्यांच्या स्वप्नांना हक्कांचा आधार”

परंतु, विरोधी पक्षनेत्यांनी ही योजना संपूर्णतः अपयशी ठरल्याचा आरोप केला. कौशल्य विकास, रोजगाराचीस्थिती इतकी वाईट आहे की, राज्यातील प्रत्येक तरुणसरकारला शिव्याशाप देत असल्याचे त्यांनी कवितेतच सांगितले.
“कौशल्याचा विकास नाही,
ना रोजगाराचा पत्ता,
तरुणांना का मूर्ख समजता?
झोडता भाषण, उठता बसता”.

अर्थमंत्र्यांना ना अर्थसंकल्पाची आकडेवारी जुळवताआली, ना भुलथापा-फसव्या घोषणा व राज्याचीवस्तुस्थिती जुळवता आली, ना किमान कवितांचीयमके जुळवता आली. यमके जुळत नव्हती तर सुधीर मुनगंटीवारांनी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्र्यांचेमार्गदर्शन घ्यायला हवे होते, अशी सूचना विखे पाटील यांनी मांडताच विधानसभेत हंशा पिकला व अनेक आमदारांनी बाकेही वाजवली. अर्थमंत्र्यांनी आपल्या भाषणात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांवरही ओळी सांगितल्या होत्या. ते म्हणाले होते,
“होळकरांचा मानबिंदू तिने गाजविले भू-लोक,
आदराने आम्ही म्हणतो, सारे तिला पुण्यश्लोक”

त्यावर राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की, हे सरकारपुण्यश्लोक अहिल्यादेवींचे नाव घेते. पण त्यांचे विचार अंमलात आणत नाही. या सरकारला पुण्यश्लोकअहिल्यादेवींबाबत खरोखर आदर असेल तर याचअधिवेशनात धनगरांना आरक्षण देण्याची घोषणा झाली पाहिजे, अशीही मागणी त्यांनी केली.

आपल्या भाषणाचा शेवट करतानाही विखे पाटील अर्थमंत्र्यांच्याच कवितेला उत्तर दिले. मुनगंटीवारांनी आपल्या भाषणात सांगितले होते की,
“खुब करो साहिब कोशिश
हमे मिट्टी मे दबाने की,
शायद आपको नही मालूम की हम बीज है,
आदत है हमारी बार बार उग जाने की,
हर बार चुनाव जितने की”

या ओळींमधून सरकारच्या सर्व घोषणा निवडणूक केंद्रीत असतात, ‘चुनावी जुमलेच’ असतात, हे स्पष्ट होते. स्वतः अर्थमंत्र्यांनीच आपल्या भाषणात याची कबुली दिली आहे, असे सांगून विखे पाटील पुढे म्हणाले की,
“हमे पता है
आप बीज नही, बल्की ‘नाचीज’ है
आदत है आपकी,
चुनाव सामने रखकर भाषण-घोषणाऍ करने की,
लेकीन अब ये जनता मूर्ख नही, ना ही भोली..
आपके ‘चुनावी जुमले अब खूब समझती है
२०१९ में आपको मिटा