fbpx

विखे पाटलांनी नैतिकता म्हणून लवकरात लवकर आपली भूमिका स्पष्ट करावी’

अहमदनगर : “डॉ. सुजय विखे पाटील यांच्या भाजप प्रवेशाचा विरोधी पक्षनेत्यांनी सर्वप्रथम निषेध करायला हवा. विखे पाटलांनी नैतिकता म्हणून लवकरात लवकर आपली भूमिका स्पष्ट करावी.”, अशी मागणी बाळासाहेब थोरात यांनी करून खळबळ उडवून दिली आहे.

सुजय विखेंच्या भाजपप्रवेशामुळे नगरच्या राजकारणाने वेगळे वळण घेतले आहे. एक उमदा युवनेता भाजपच्या गळाला लागल्याने कॉंग्रेसमधील अंतर्गत वाद आता उफाळून येण्याची शक्यता आहे. यातच विखे कुटुंबाने काँग्रेस पक्षाकडे जे मागितलं, ते दिलं. त्यामुळे मुलाने हट्ट केला, तर वडिलांनी त्याला समजवायला हवं होतं, असे म्हणत थोरात यांनी राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर निशाणा साधला आहे.

सुजय विखे यांचा भाजप प्रवेशाचा सोहळा फडणवीस यांच्या उपस्थितीत काल मुंबईत पार पडला. यानंतर आता राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर राजीनामा देण्याचा दबाव वाढू लागला आहे. बाळासाहेब थोरात यांनी केलेली ही मागणी याच अनुषंगाने असून आता राधाकृष्ण विखे पाटील हे काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

1 Comment

Click here to post a comment