मतं फुटली पण ती कॉंग्रेसची नाही- राधाकृष्ण विखे-पाटील

radha krushn vikhe patil leader of opposition

टीम महाराष्ट्र देशा: विधानपरिषद पोटनिवडणुकीत भाजपच्या प्रसाद लाड यांनी तब्बल २०९ मतं मिळवत दणदणीत विजय मिळवला. पण या विजयानंतर विरोधकांची चर्चा सुरु झाली ते ‘गद्दार’ आमदार कोण  ? पण काँग्रेसची मतं फुटली नसल्याची मला खात्री विधानसभा विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांना आहे. तस विधान सुद्धा त्यांनी अहमदनगर येथे केल आहे.

काय म्हणाले विखे-पाटील ? 

‘विधानपरिषद पोटनिवडणुकीत मतं फुटली हे दुर्दैव आहे. पण काँग्रेसची मतं फुटली नसल्याची मला खात्री आहे. मात्र, फुटलेल्या दोन मतदारांनी अगोदरच काँग्रेसमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. पण पक्षात असेपर्यंत त्यांनी पक्षाचा आदेश पाळायला हवा होता. या संदर्भात अहवाल आल्यावर त्यांच्यावर पक्षीय स्तरावर कारवाई होईल.’