गुजरातमध्ये निसटती संधी म्हणजे भाजपसाठी जनतेचा इशारा – विखे पाटील

नागपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसमुक्त भारताची वल्गना केली होती. पण त्यांच्या गृह राज्यातच भाजपला पुन्हा सत्ता स्थापण्याची निसटती संधी मिळाली, हा मतदारांचा कौल भाजपने लक्षात घेतला पाहिजे. हा जनतेचा इशारा आहे, असे विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटले आहे.

bagdure

गुजरात विधानसभा निवडणुकीत निकालांबाबत प्रतिक्रिया व्यक्त करताना ते बोलत होते. ते पुढे म्हणाले की, मागील निवडणुकीच्या तुलनेत यंदा काँग्रेसच्या किमान १६ जागा वाढतांना दिसत आहेत. काँग्रेसला झालेले मतदान ३८ टक्क्यांवरून ४१.५ टक्क्यांवर गेले आहे. त्यामुळे पक्षाच्या कामगिरीत भरीव सुधारणा आहे आणि यामध्ये काँग्रेस अध्यक्ष खा. राहुल गांधी यांच्या नेतृत्वाचे मोठे श्रेय आहे.

या निकालाने भाजपविरोधात नाराजीची लाट तीव्र होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. गुजरातमध्ये लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत भाजपला मिळालेल्या जागा आणि मतदान मोठ्या फरकाने कमी झाल्याकडेही विखे पाटील लक्ष वेधले.

You might also like
Comments
Loading...