विखे पाटील नशीबवान; भाजपमध्ये आले आणि मंत्री झाले

eknath khadse

टीम महाराष्ट्र देशा : भाजपचे जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी विखे पाटील नशीबवान आहेत. ते भाजपमध्ये आले आणि मंत्री झाले अस विधान केले आहे. विरोधी पक्षनेतेपदी विजय वडेट्टीवारांची निवड झाल्यानंतर केलेल्या भाषणात त्यांनी हे वक्तव्य केले आहे.

एकनाथ खडसे हे मंत्री होते परंतु भ्रष्टाचाराच्या आरोपांवरून मंत्रिमंडळातून जावं लागल होत. परंतु मंत्रिमंडळात पुन्हा परत येण्याची संधी न मिळणं याची खंत एकनाथ खडसेंच्या मनात कायम आहे. विरोधी पक्षनेतेपदी विजय वडेट्टीवारांची निवड झाल्यानंतर केलेल्या भाषणात त्यांनी जय वडेट्टीवारांना योगायोगामुळे विरोधी पक्षनेतेपद मिळालं. विखे पाटीलांमुळे तुम्हाला विरोधी पक्षनेते पद मिळालं अस विधान केले.

तसेच पुढे बोलताना, कधी कधी मुख्यमंत्र्यांना वाटतं की मी विरोधी पक्षात तर जाणार नाही ना? विखे पाटील नशीबवान आहेत की त्यांनी विरोधी पक्ष पद सोडलं आणि त्यांना मंत्री पद मिळालं. आमच्यात नेमकं काय झालंय ते मला आणि मुख्यमंत्र्यांनाच माहिती आहे असंही त्यांनी सांगितलं.

दरम्यान, कॉंग्रेसच्या सत्ताकाळात विरोधीपक्ष नेता म्हणून दिलेली जबाबदारी मी चोख पार पाडली. जनतेच्या मनात सरकारच्या विरोधात वातावरण निर्माण करून आपल्या पक्षाची सत्ता आणण्याचं काम विरोधीपक्ष नेत्याचं असतं. त्यामुळे भाजपची सत्ता येण्यात मी केलेल्या कामाचा खारीचा वाटा आहे, असे म्हणत एकनाथ खडसे यांनी विधानसभेचे नवे विरोधी पक्ष नेते विजय वड्डेटीवार यांचे अभिनंदन केले.