fbpx

विखे पाटील भाजपचा जाहीरपणे प्रचार करतात; संग्राम जगतापांचा आरोप

टीम महाराष्ट्र देशा –  काँग्रेस नेते राधाकृष्ण विखे पाटील हे त्यांचा मुलगा सुजयचा छुपा नाही, तर जाहीरपणे प्रचार करत असल्याचा आरोप संग्राम जगताप यांनी केलाय. पण काहीही झालं तरी निवडणूक आपणच जिंकणार असल्याचा दावाही संग्राम जगताप यांनी केला. सागरम जगताप यांनी आज उमेदवारी अर्ज केला त्यावेळी पत्रकारंशी बोलताना त्यांनी हा दावा केला.

नगर लोकसभा मतदारसंघातील आघाडीचे उमेदवार आमदार संग्राम जगताप यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला. हा अर्ज शेतकरी पती-पत्नीच्या हस्ते दाखल केला. उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी जगताप यांनी शहराचे ग्रामदैवत विशाल गणपतीचे दर्शन घेतले. तसेच त्यांनी जुन्या बसस्थानक चौकातून  जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत महारॅली काढण्यात आली. या महारॅलीला नगरकरांचा तुफान प्रतिसाद पाहायला मिळाला.

दरम्यान, भाजपचे उमेदवार डॉ.सुजय विखे यांनी उमेदवारी अर्ज दाखल करताना असचं शक्तीप्रदर्शन केल होत. त्यामुळे नगरची लढाईत ‘हम भी किसी से कम नही’ हेच संग्राम जगताप यांनी दाखून दिल आहे.