नगरमध्ये आघाडीत बिघाडी; जगतापांचा अर्ज भरण्यास विखे पाटलांची गैरहजेरी

टीम महाराष्ट्र देशा – राष्ट्रवादी – कॉंग्रेस आघाडीचे नगर दक्षिणचे उमेदवार संग्राम जगताप यांचा उमेदवारी फॉर्म भरायला जाण्यास विरोधीपक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी साफ नकार दिला आहे. यामुळे आता विखे पाटील आघाडीत बिघाड करत आहे कि काय असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

विखे पाटील यांचे सुपुत्र सुजय विखे यांनी भाजप मध्ये प्रवेश केल्यानंतर विखे यांच्यासमोर एक नवा पेच उभा राहिला होता. तसेच नगर जिल्ह्यात कॉंग्रेसने भाजपचे उमेदवार सुजय विखे यांचा प्रचार करण्याचा निर्णय घेतला आहे. यावर विखे पाटील यांनी सावध प्रतिक्रिया दिली आहे. ते नगरमध्ये स्थानिक नेत्यांनी काय भूमिका घेतली यावर काय करायचं हे पक्ष ठरवेल.”

दरम्यान, राधाकृष्ण विखे पाटील यांनी नगर दक्षिणचे भाजपचे दिलीप गांधी यांची भेट घेतली. त्यांनी जवळपास तासभर चर्चाही केली. त्यामुळे जिल्ह्यात वेगवेगळ्या राजकीय चर्चांना उधाण आलं होतं. दिलीप गांधींच्या भेटीनंतर विखेंनी ‘दिलीप गांधी आणि आमचे घरगुती संबंध आहेत, हे घर माझचं आहे’ असेही स्पष्ट केले होते.