राष्ट्रवादीच्या वाताहती मागे विखेंचा हात ? अनेक जिल्ह्यांमध्ये राष्ट्रवादीचं अस्तित्व धोक्यात

टीम महाराष्ट्र देशा : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांनी सत्ताधरी भाजपकडे धाव घेतली आहे. तर अनेक नेत्यांनी सत्तेत भागीदार असणाऱ्या शिवसेनेकडे पळ काढला आहे. त्यामुळे निवडणुकी आधीचं अनेक जिल्ह्यांमध्ये राष्ट्रवादी पक्षाचं अस्तित्व धोक्यात आले आहे. राष्ट्रवादी सारख्या ताकदवान पक्षाला असे दिवस आल्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.

लोकसभा निवडणुकीपूर्वीचं भाजपमध्ये इनकमिंग वाढले होते. तर लोकसभा निवडणुका जवळ येताचं विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मुलानेचं म्हणजे सुजय विखे यांनी परस्पर निर्णय घेऊन भाजपत प्रवेश केला होता. भाजपात प्रवेश केल्यानंतर लोकसभा निवडणुकीत सुजय विखे यांना घसघशीत यश मिळाले. त्यानंतर राधाकृष्ण विखे पाटील यांनी देखील आपल्या विरोधीपक्ष नेते पदाचा राजीनामा दिला आणि भाजपात प्रवेश करत मंत्रीपद पटकावले.

अशी काही राजकीय सूत्र बदलत असतानाचं राधाकृष्ण विखे पाटील यांनी सूचक विधान केले होते. येत्या काही दिवसातचं राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अनेक नेते भाजपात येणार आहेत. तसेच अनेक नेते माझ्या संपर्कात आहेत. त्यांचे ते विधान आता खरे होताना दिसत आहे. दिग्गज नेत्यांनी राष्ट्रवादी आणि काँग्रेस सोडून भाजपमध्ये येण्याचा धडाका लावला आहे.

तसेच याबाबत नुकतेच भाजपवासी झालेले मधुकर पिचड यांनी देखील भाष्य केले आहे. भाजपमध्ये येण्याचा मार्ग आम्हाला राधाकृष्ण विखे पाटील यांनीच दाखवला, असे म्हणत पिचड यांनी राधाकृष्ण विखे पाटील यांचे आभार मानले. त्यामुळे पिचड यांच्या तोंडून हे ऐकताच अनेकांच्या भुवया उंचावल्या.