सरकारची एक्स्पायरी डेट जवळ आली – विखे पाटील

नागपूर : आज पासून नागपूरमध्ये विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. त्यापूर्वी विधिमंडळ अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला विरोधकांनी पत्रकार परिषद घेऊन राज्यातील विविध प्रश्नांवरून सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. यावेळी मुंबई सिडको जमीन घोटाळ्याची न्यायालयाच्या देखरेखीखाली चौकशी करण्याची मागणी देखील विरोधकांनी केली.

दरम्यान सरकारची एक्स्पायरी डेट ठरली असून ती कदाचित २०१९ पूर्वीच येईल अशी घणाघाती टीका यावेळी विधानसभा विरोधीपक्ष नेते विखे-पाटील यांनी केली. तसेच ते पुढे बोलतना म्हणाले की, मंत्र्यांच्या भ्रष्टाचाराबाबत या सरकारची भूमिका दुटप्पी असून शिवसेनेच्या मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप झाले तर चौकशी अधिकारी नियुक्त होतात. मात्र भाजपाच्या मंत्र्यांवरील भ्रष्टाचाराच्या आरोपाची लोकायुक्तांकडून चौकशी केली जाते.

Loading...

दरम्यान विरोधकांच्या टीकेला उत्तर देताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हंटलं आहे की, जमीन घोटाळ्याची न्यायालयाच्या देखरेखीखाली चौकशी करण्याची मागणी विरोधकांनी केली आहे. या चौकशीस आपण तयार असून, यातील बिल्डर मनिष भतिजा यांचे काँग्रेस सरकारमध्ये ‘चाचा’ कोण होते व त्या काळात याप्रकारे किती भूखंड दिले तेही जाहीर करू.

वैद्यकीय शिक्षण विभागात कोट्यवधींचा घोटाळा- धनंजय मुंडे

मोदी काळ्या पैश्यांच्या मुद्द्यावर गप्प का ? : मायावती

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

धनंजय मुंडेंकडून पंकजा मुंडेंना पुन्हा धक्का
आमची 'आरती ' त्रास देत नाही ; तर तुमच्या ' नमाज ' चा त्रास कसा सहन करणार
अरे तुम्ही काय संरक्षण काढता, पवारांच्या संरक्षणासाठी महाराष्ट्रातील पैलवान सरसावले
'उद्धव ठाकरे अनुभवशून्य मुख्यमंत्री; महाराष्ट्राची वाटचाल अधोगतीकडे'
राष्ट्रवादीची गुंडगिरी : भाजपने केला सत्ताधारी पक्षावर हल्लाबोल
दोस्ती तुटायची नाय : शिवसेनेच्या पाठिंब्यामुळे पालिकेत भाजपचा महापौर
राणेंच्या मुख्यमंत्र्यांवरील 'त्या' टिकेला अजितदादांचे रोखठोक प्रत्युत्तर, म्हणतात...
करोना आजार होऊ नये याकरिता दक्षता घेण्याबाबत पुणे मनपाचे आवाहन
जातीवाद रोखण्यासाठी शरद पवार मैदानात; सरकार उचलणार 'हे' पाऊल
सलमान अजूनही कतरीनाच्या प्रेमात स्वत:च दिली कबुली