fbpx

विखेंचा भाजप प्रवेश, काँग्रेस आमदारांसह बैठक सुरू

टीम महाराष्ट्र देशा : कॉंग्रेस नेते राधाकृष्ण विखे पाटील यांचा भाजप प्रवेश आता निशित झाला आहे. आता केवळ औपचारिकता बाकी आहे. याच पार्श्वभूमीवर राधाकृष्ण विखे पाटील यांची मुंबईत काँग्रेस आमदारांसह बैठक सुरू झाली आहे. काँग्रेसचे आमदार भारत भालके, जयकुमार गोरे, अब्दुल सत्तार आणि माढाचे खासदार रणजित निंबाळकर यांचा या बैठकीत समावेश असून भाजप प्रवेश करण्यापूर्वी विखे – पाटील काही इतर काँग्रेसच्या आमदारांशी संवाद साधत आहेत.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राधाकृष्ण विखे – पाटील हे आज आपल्या आमदारकीचा राजीनामा देण्याची देखील शक्यता आहे. विधीमंडळात जाऊन विखे – पाटील राजीनामा देणार आहेत. त्यामुळे विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.

पुत्र सुजय विखेच्या भाजप प्रवेशानंतर राधाकृष्ण विखे पाटील हे देखील भाजपात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सुरु झाल्या होत्या. तर लोकसभा निवडणुकीतही राधाकृष्ण विखे पाटील यांनी कॉंग्रेस आघाडीच्या उमेदवारच प्रचार करण्या ऐवजी युतीच्या उमेदवारच प्रचार केला होता. तसेच विखे पाटील यांनी शेवटच्या टप्प्यात भाजपच्या अनेक नेत्यांच्या भेटीगाठी देखील वाढवल्या होत्या. त्यामुळे विखेंचा भाजप प्रवेश हा जवळपास निश्चितचं झाला आहे. मात्र आता फक्त राधाकृष्ण विखे पाटील आपल्या बरोबर किती कॉंग्रेस आमदार भाजपमध्ये घेवून येणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.