‘लागीर रं झालं जी’ फेम विक्याची विकास तरुण मंडळाला सदिच्छ भेट

‘एक…दोन…तीन…चार… गणपतीचा जय जयकार’, ‘मोरया रे… बाप्पा मोरया रे…’, ‘गणपती बाप्पा मोरया…मंगलमूर्ती मोरया! बाप्पाच्या जयघोषाने संपूर्ण वातावरण भक्तीमय झाले आहे. मुंबई-पुणे-नाशिकसह संपूर्ण राज्यात बाप्पाच्या आमनाचा सोहळा उत्साहात सुरू आहे. आरती, गणपती स्त्रोत, मंत्र असे मंगलदायी वातावरण घरोघरी आणि सार्वजनिक गणेश मंडळामध्ये पाहायला मिळत आहे.

श्रींची आरती करण्यासाठी मराठी चित्रपटसृष्टीतील कलाकार खूप उत्सुक असल्याचं चित्र  वारजे येथे पाहायला मिळाले. वारजे येथील विकास तरुण मंडळात. दि. १७ ( सोमवार ) रोजी ‘ लागीर रं झालं जी’ या मालिकेतील अभिनेता निखिल चव्हाण उर्फ विक्या याने विकास तरुण मंडळाला सदिच्छ भेट दिली. यंदा मंडळाची ‘एक गाव एक गणपती’ हि संकल्पना आहे. वारजे गावातील ५ मंडळांनी एकच गणपतीची प्राणप्रतिष्ठा केली आहे. मंडळाची हि संकल्पना पाहून निखिल चव्हाण हे भारावून गेले आणि प्रत्येक मंडळांनी या मंडळांकडून आदर्श घेण्याचं आवाहन त्यांनी केलं.

अभिनेता निखिल चव्हाण उर्फ विक्या आल्याने मंडळांच्या सदस्यांमध्ये कमालीचा उत्साह दिसून येत होता, गणेश मंडळांत शेकडोंच्या संख्येने भाविक सहभागी झाले होते. बाप्पाचा फोटो आणि आपल्या आवडत्या कलाकारांसोबत सेल्फी  घेण्यासाठी प्रत्येकाची घाई दिसत होती.

श्रींची आरती ‘ लागीर रं झालं जी’ या मालिकेतील अभिनेता निखिल चव्हाण उर्फ विक्याच्या हस्ते झाली. त्या प्रसंगी श्री. दिगंबर चौधरी, नितीन निंबाळकर, कमलेश  चौधरी, शेखर दांगट, महेश नागरे, मयूर चौधरी, कौशल चौधरी आणि मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते.