बॉक्सर विजेंदरचा धडाका, अमेरिकेच्या माइक स्नायडरचा केला पराभव

टीम महाराष्ट्र देशा- भारताचा बॉक्सिंगमधील पहिला ऑलिम्पिक आणि जागतिक पदकविजेता खेळाडू असलेला विजेंदर सिंगने बॉक्सिंगमध्ये यशस्वी पुनरागमन केलं आहे. त्याने अमेरिकेच्या माइक स्नायडरचा पराभव करत बॉक्सिंगच्या करियरमधील सलग अकरावा विजय मिळवला आहे.

अमेरिकेच्या नेवार्क अर्थात न्यूजर्सी येथे हा सामना खेळला गेला. या सामन्यात विजेंदरने स्नायडरला नॉकआऊट केले. विशेष म्हणजे विजयने आतापर्यंत प्रो-बॉक्सिंगमध्ये ११ सामने खेळले आहेत आणि हे सर्व सामने विजयने जिंकले आहेत.