विजेंदरने चिनी बाॅक्सरला लोळवलं

वेबटीम : भारताचा बॉक्सिंग स्टार विजेंदर सिंगने प्रो-बॉक्सिंगमध्ये चीनचा बॉक्सर मायमायतीचा दणदणीत परावभव केला. या विजयासोबतच विजेंदरने चीनला सीमेवर शांततेचा संदेशही दिला. या विजयामुळे विजेंदरने आपली विजयी घोडदौड सुरूच ठेवली आहे. विजेंदरने 96-93, 95-94, 95-94 असा सामना जिंकला.

या विजयासह विजेंदरने डब्ल्युबीओ आशिया पॅसिफिक सुपर मिडलवेटचा खिताब कायम ठेवलाय. या सोबतच WBO ओरिएंटल सुपर मिडलवेट टाइटलचा खिताबही जिंकलाय. विजेंदर WBO आशिया पॅसिफिक मिडलवेट चॅम्पियन पहिल्यापासून होता.
विजेंदरला प्रो बाॅक्सर होण्यासाठी चांगलीच झुंज द्यावी लागली. चीन बाॅक्सर मैमतअलीने विजेंदरच्या पोटावर निशाणा साधला होता. त्यामुळे विजेंदर चांगलीच अडचण आली होती. पण विजेंदरने जोरदार पंच लगावत चीन बाॅक्सरचा धुव्वा उडवला.

मायमायतीवरील विजयानंतर विजेंदरने खिताब घेण्यास नकार दिला. ‘हा खिताब मायमायतीला देण्याची आपली इच्छा आहे. किमान यामुळे तरी सीमेवर शांतता ठेवण्याचा संदेश चीनला जाईल’, असं विजेंदर म्हणाला. ‘मायमायती सोबतची लढत आपण सहज जिंकू असं वाटलं होतं. पण मायमायतीने चांगलेच आव्हान दिले. त्याने सामन्यादरम्यान आपल्या बॉक्सिंगने अनेकदा चकीतही केले’, असं विजेंदर म्हणाला.