विजयसिंह मोहिते-पाटील लोकसभा लढणारच; परंतु राष्ट्रवादी की भाजपा?

माढा : लोकसभा मतदार संघावर संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून असते. या मतदार संघात अजून ही राष्ट्रवादीच्या उमेवारीचा तिढा अजूनही सुटलेला नाही. त्यात निवृत्त सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख यांनी माढा मतदारसंघात जोरदार तयारी चालवली आहे. सातत्याने त्यांचे दौरे आणि स्थानिक नेत्यांचा मिळणारा पाठींबा यामुळे मोहिते-पाटील गटाचे कार्यकर्ते कमालीचे अस्वस्थ झालेले पाहवयास मिळत आहेत. राष्ट्रावादीने तिकीट नाही दिले तर कार्यकर्ते भाजपमधून लोकसभेला विजयसिंह मोहिते-पाटील यांनी उभे राहण्याची भाषा बोलत आहेत.

विजयसिंह मोहिते-पाटील हे राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून शरद पवारांसोबत आहेत. शरद पवार यांचे कट्टर समर्थक मानले जातात. त्यांनी आमदार, मंत्री ते उपमुख्यमंत्री पदापर्यंत पदे भूषविली आहेत. परंतु विधानसभेचा पराभवामुळे त्यांच्यावर चांगलीच नामुष्की आली होती. पक्षाने पुन्हा लोकसभेची उमेदवारी दिली. त्यात ते विजय झाले.

येणाऱ्या लोकसभेला मोहिते-पाटील यांनाच तिकीट मिळणार अशी आधी चर्चा होती, परंतु निवृत्त सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख यांनी माढा, करमाळा, पंढरपूर, सांगोला, माळशिरस या भागात चांगलीच मोर्चे बांधणी सुरु केली आहे. पाणी, वीज, रस्ते, दुष्काळ असे विषय सोडवणाऱ्या उमेदवाराला लोकसभेत पाठवले जायला हवे, असे ते सांगताना दिसत आहेत. त्यामुळे राष्ट्रावादीने तिकीट नाही दिले तर कार्यकर्ते भाजपमधून लोकसभेला विजयसिंह मोहिते-पाटील यांनी उभे राहण्याची भाषा बोलत आहेत.