fbpx

मावळ, बारामतीत राष्ट्रवादीचा पराभव निश्चित- मोहिते पाटील

टीम महाराष्ट्र देशा- माढा लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचा प्रचार करताना पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मोहिते- पाटील यांच्यावर केलेल्या टीकेला आज मतदानाच्यावेळी खासदार विजयसिंह मोहिते-पाटील यांनी प्रत्युत्तर दिले. पवारांच्या टीकेला मतदारच चोख उत्तर देतील. केवळ माढ्यातच नव्हे तर मावळ आणि बारामतीमध्ये देखील राष्ट्रवादीला पराभव स्विकारावा लागेल, असा विश्वास  मोहिते-पाटील यांनी केला आहे.

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्यातील मतदानाला आज सकाळी सात वाजता सुरुवात झाली आहे, महाराष्ट्रातील १४ जागांसह देशातील ११७ लोकसभा मतदारसंघात आज मतदान होत आहे, लोकशाहीच्या उत्सवात देशातील नागरिक मोठ्या उत्साहाने सहभाग घेत आहेत.

दरम्यान,शरद पवार यांनी आणि त्यांच्या कुटुंबाने घराणेशाहीचा उत आणला आहे, आधी उमेदवारी जाहीर करून पुन्हा पराभव दिसल्याने पवार यांनी माघार घेतली, आता त्यांच्या कुटुंबातील एकही व्यक्ती लोकसभेत जाणार नाही, अशी परिस्थिती असल्याचं मत महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापुरात व्यक्त केले आहे.