fbpx

गटबाजीच्या विळख्यात सापडलेल्या माढ्याचा तिढा सुटला; मोहिते-पाटीलांना उमेदवारी?

करमाळा- बहुचर्चित माढा लोकसभा मतदारसंघाचा तिढा अखेर सुटला असून माढ्यातून राष्ट्रवादीचे विद्यमान खासदार विजयसिंह मोहिते-पाटील यांना उमेदवारी मिळणार असल्याचे विश्वसनीय सुत्रांकडून माहिती मिळालेली असून माढ्याचा तिढा आता सुटला असून गटबाजीला मात्र उधान येणार आहे.

एका मराठी वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार, येत्या दोन महिन्यात होणाऱ्या लोकसभा निवडणूकींमध्ये माढा लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीकडून कोणाला उमेदवारी मिळणार हे उत्सुकतेचे होते, उमेदवारी मिळण्यासाठी निवृत्त अधिकारी प्रभाकर देशमुख यांनी जोरदार फिल्डींग लावलेली होती. त्यानुसार त्यांनी मतदारसंघात दौरे ही केलेले होते. तसेच माढ्यातून रोहित पवार आणि पार्थ पवार यांना उमेदवारी मिळणार अशीही चर्चा सुरू होती परंतु आता या चर्चेला पुर्ण विराम मिळालेला असून खासदार विजयसिंह मोहिते-पाटील यांना राष्ट्रवादीची उमेदवारी जवळजवळ निश्चित झालेली असून माढ्याचा तिढा सुटलेला आहे.

माढा हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असून २००९ साली माजी केंद्रिय कृषी मंत्री शरद पवार निवडून आले होते तर २०१४ साली मोदी लाट असूनही विद्यमान खासदार विजयसिंह मोहिते-पाटील यांनी महायुतीचे उमेदवार व सध्याचे कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांचा पराभव केलेला होता.

खासदार विजयसिंह मोहिते-पाटील यांनी पुन्हा लोकसभेची तयारी चालवली आहे. मतदार संघात नेत्यांच्या गाठी भेटी, मतदारांशी चर्चा, विधानसभा निहाय दोरे सध्या मोहिते-पाटील करताना दिसत आहेत. येणाऱ्या निवडणुकीतही मोहिते-पाटील यांनाच तिकीट मिळणार असल्याचे मानून मोहिते-पाटील समर्थक सध्या लोकसभेची तयारी करत आहेत.तर दुसऱ्या बाजूला अंतर्गत विरोधकांचे गट सुद्धा सक्रीय झाले असून काही दिवसांपूर्वी टेंभुर्णीत येथे संजयमामांच्या मळ्यात सांगोल्याचे शहाजीबापू, माळशिरसचे उत्तमराव, बार्शीचे राजाभाऊ, फलटणचे रणजीत नाईक निंबाळकर, म्हसवडचे जयकुमार गोरे, शेखर गोरे हे जमले होते. माढा लोकसभेची गणित यावेळी त्यांनी नव्याने मांडली असल्याचे समजते आहे.

२०१९ लोकसभेला कुठल्याही परिस्थितीत माढा मतदारसंघ ताब्यात घ्यायचा असा राष्ट्रवादीचा इरादा असून बाहेरील उमेदवार देऊन राष्ट्रवादी रिस्क घेण्याच्या तयारीत नसल्यामुळे खासदार विजयसिंह मोहिते-पाटील हेच निवडून येण्यासारखे उमेदवार असल्यामुळे त्यांनाच उमेदवारी जवळजवळ निश्चित केलेली असून त्यांना विरोध करणारे शांत बसणार की गटबाजी करणार हे येणारा काळच सांगेल.

 

2 Comments

Click here to post a comment